जळगाव, (प्रतिनिधी) – फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ मध्ये सहभागी होण्यास इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kasuhalya.mahaswayam.gov.in अथवा https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर २० डिसेंबर पर्यंत नोंदणी करावी. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ साठी जिल्हा, विभाग, राज्य व देशपातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे मानांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेकरीता सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, कौशल्य विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२२ व त्यानंतरचे असणे अनिवार्य आहे. तसेच, Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Gigital Construction, Industrial Design Technology, Industry ४.०, Information Network Cabling , Mechatronics, Robot System Integration @ Water Technology या क्षेत्राकरीता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी १९९९ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस.ग्राऊंड शेजारी, जळगाव येथे प्रत्यक्ष अथवा ०२५७-२९५९७९० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री.रिसे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.