काल सर्वत्र शाळेचा पहिला दिवस पाहायला मिळाला.शाळेत मुलांचे खाऊ व गुलाबाची फुले देऊन जोरदार स्वागतही झाले.इंग्रजी शाळेकडे पालकांचा कल पाहायला मिळाला.परंतु आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालून किंवा मुलांना फाड फाड इंग्रजी बोलणे शिकवून खूप काही करतोय असे समजण्याची गरज नाही.म्हणूनच कालपासून सोशल मीडियावर पालकांना उद्देशून हा मॅसेज फिरत आहे.आपणही तो नक्की वाचावा…
मुलांना आज काय शिकविण्याची गरज आहे
????रात्री लवकरच झोपणे व सकाळी लवकरच उठणे.
????किमान 5/10 मिनिटं एका जागेवर शांत बसणे , एकाग्रता वाढविणे .
????सलग एक ते दोन तास एका जागेवर बसून वाचन , लेखन , अभ्यास करण्याची सवय लावणे .
????चांगल्या व आवश्यक सूचना ऐकूण घेवून त्यांवर विचार करण्याची सवय लावणे .
????घरातील लहान मोठ्या व्यक्तींशी चर्चा , संवाद साधने , विचारविनिमय करणे .
????आपली मते घरांतील व्यक्ती , शिक्षक , सहकारी मित्र यांचे बरोबर व्यक्त करणे .
????चांगले काय आणि वाईट काय याचा सारासार विचार करुन योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे .
????खरे काय , खोटे काय याची वास्तवाशी सांगड घालून पडताळा घेणे व सत्याच्या मार्गानेच जाणे .
????व्यवहारिक द्रुष्ट्या योग्य काय व अयोग्य काय याची समज येणे .
????अंधश्रद्धा न मानता विज्ञानाच्या आधारावर , प्रत्यक्ष पडताळा घ्यायचा प्रयत्न करणे .
????मोबाईल , T V , सोशियल मेडिया याचा कामापूरता व मर्यादित वापर करणे .
????घरातील व घराबाहेरील कामे मनापासून करण्याची सवय लावणे .
????शिक्षण हे फक्त नोकरी मिळण्यासाठी व पैसे कमविण्यासाठी नसून माणुस म्हणून जगण्यास लायक बनविण्यासाठी आहे हे रुजवीणे .
????नोकरी नाही मिळाल्यास कोणताही व्यवसाय करण्याची क्षमता प्राप्त करणे .
????आपल्या कुटुंबातील , समाजातील लहान मोठ्या व्यक्तींचा आदर राखण्यास शिकविण्यासाठी शिक्षण असावे .
????जिवनात नेहमीच आशादायी व सकारात्मक द्रुष्टीकोण निर्माण करायला शीकवीणे .
????आपली क्षमता पाहून स्पर्धा करणे आवश्यक , अनावश्यक स्पर्धा टाळणे शिकणे आवश्यक .
????दुसरे करतात म्हणून आपणही तेच न करता वेगळे करण्याचा प्रयत्न करायला शीकवीणे .
????विनाकारण दुसऱ्यांना कमी लेखने व टीकाटिप्पणी करणे टाळावे .
????प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात ते घेण्याचा प्रयत्न करायाला शीकवीणे .
????परीक्षेत किती गुण मिळाले हे महत्वाचे नसून त्यांचेमध्ये किती नितिमुल्ये रुजली हे महत्वाचे आहे .
????अब्राहम लिंकनने हेडमास्तर यांना लिहिलेले पत्र किमान आठवड्यातून एकदा वाचून दाखवून त्याचा अर्थ स्पष्ट करुन सांगणे .
????साने गुरुजी यांचे शामची आई या व अशा कथा वाचुन त्याचा अर्थ समजून घेण्यास शीकवीणे .
????स्वकष्टाने कमविलेल्या एका छदामची किंमत वाम मार्गाने कमवीलेल्यl घबाडापेक्षा किती तरी पटीने जास्त असते हे शिकणे आवश्यक आहे .
????चांगले इंग्रजी शिकला म्हणजे हुशार झाला असे नसून मातृभाषेतून संस्कार व व्यवहार शिकला म्हणजे हुशार झाला .
आजकाल या व अशाच शिक्षणाबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे तर आणि तरच तो विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होईल आणि जिवन जगण्यास लायक होईल असे वाटते .
पालक वर्गाने यांवर जरूर विचार करावा असे वाटते
????????????????????????????