जळगाव,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक संजयजी भोकरे,राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे,खान्देश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा यांच्या मार्गदर्शनानुसार पत्रकार संघाच्या भडगांव तालुका अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार अशोक बापु परदेशी यांची तर ग्रामिण जिल्हा कार्याध्यपदी युवा पत्रकार गणेश रावळ यांची निवड खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलीआहे.

यावेळी शासकिय विश्रामगृह येथे पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांन सह सदस्यानी नवनियुक्त भडगांव तालुका अध्यक्ष अशोक बापु परदेशी व जिल्हा कार्याध्यक्ष गणेश रावळ यांचा सत्कार केला याप्रसंगी भडगांव तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.














