रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली. मात्र, नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, नागरिक बँकेत जाऊन नोटा बदलू शकतात. बँकांव्यतिरिक्त पेट्रोल पंप आणि सोन्याच्या दुकानांवर नागरिक 2000 रुपयांच्या नोटा खर्च करत आहेत. मात्र तुम्हाला आता नोटा बदलण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे कारण आता नोटा बदलविण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहे.वेळेत तुम्ही तुमच्या कडे असलेल्या दोन हजाराच्या नोटा बदलवून घेतल्या नाही तर नंतर तुमच्या नोटा स्विकारल्या जाणार नाही आणि तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागेल.
दोन हजारांच्या नोटा परत करा, उरले ३० दिवस
व्यवहारातून बाद केलेल्या २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी वा बदलण्यासाठी आता केवळ १ महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या नोटा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बदलून घेता येऊ शकतात, अथवा बँकेत जमा केल्या जाऊ शकतात.आरबीआयच्या निर्णयानुसार, एक व्यक्ती एका वेळी २० हजारांच्या नोटाच कोणताही फॉर्म न भरता बदलून घेऊ शकते. बदलून घेताना कोणत्याही प्रकारे ओळखपत्र देण्याची गरज नाही.