जळगाव – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित मधील कामगार संघटना बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम
चे जळगाव विभागातील वार्ताफलकाचे दि.०९.११.२०१९ रोजी संघटनेचे परिमंडळ सचिव श्री.विजय सोनवणे यांच्या हस्ते व कार्यकारी अभियंता
श्री.संजय तडवी व उपव्यवस्थापक श्री.सी.बी.केदार यांच्या उपस्थित अनावरण करण्यात आले.
वार्ताफलकाचा उपयोग कामगाराच्या अडीअडचणी सोडविणे,कंपनीचेध्येय धोरणे व महापुरुषांचे विचार कामगारापर्यंत पोचविणे
बाबत आवाहन संघटनेचे परिमंडळ सचिव श्री.विजय सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्कल सचिव चेतन नागरे,विभागीय अध्यक्ष चरणदास पांढरे विभागीय सचिव राहुल वडनेरे सह
विभागातील सभासद पदाधिकारी यांनी केले.