मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध अनेक क्षेत्रात भरारी घेतली आहे.तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं आहे की आता आपण यशस्वीरित्या जगासोबत एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहेत, मोबाईलच्या तंत्रज्ञात देखील मानवाने मोठी प्रगती केली आहे. सध्याच्या काळात आपल्या कडे असणारा ‘स्मार्ट मोबाईल फोन’ म्हणजे गरज होऊन बसला आहे.आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. सध्या जगातील ६६.९२ टक्के लोक मोबाईल फोन वापरतात आणि ही टक्केवारी सातत्याने वाढत आहे. अन्न, वस्र आणि घर यानंतर आता मोबाईल ही माणसाची चौथी गरज बनण्याच्या मार्गावर आहे.
मोबाईल फोन हे हातातील वायरलेस उपकरण आहे. प्रथम मोबाईल फोन फक्त फोन कॉल करू आणि प्राप्त करू शकत होते. दुसरीकडे, आजचे मोबाइल फोन कार्यक्षमतेने भरलेले आहेत. वेब ब्राउझर, गेम्स, कॅमेरा, व्हिडीओ प्लेयर्स आणि अगदी नेव्हिगेटिंग सिस्टीम ही मोबाईल फोनची काही महत्त्वाची कार्ये आहेत. सेल्युलर फोन किंवा सेल फोन मोबाइल फोनसाठी इतर अटी आहेत.
तुमचा स्मार्ट मोबाईल फोन तुमचं खाजगी बोलणं रेकॉर्ड करतोय जर तुम्ही तुमच्या मोबाईलची ‘ही’ सेटिंग सुरु ठेवली असेल तर काळजी घ्या आणि ती सेटिंग बंद करा अन्यथा तुमच्या उपयोगात वाटणारा आणि ज्या स्मार्ट फोनमुळं तुम्ही राहू शकत नाही तो फोन तुमचं खाजगी बोलणं रेकॉर्ड करून तुमची प्रायव्हसी भंग करत आहे. स्मार्ट मोबाईल फोन वापरणारे जरा काळजी पूर्वक वाचा…. आपण जेव्हा जेव्हा फोनवर एक नवीन APP डाउनलोड करतो आणि ते वापरणे सुरू करण्यासाठी, आम्हाला कधीकधी मायक्रोफोन चालू करण्याची परवानगी देण्यास सूचित केले जाते. मायक्रोफोन प्रवेश मंजूर करून, आम्ही आमचे फोन कॉल रेकॉर्ड करण्यासाठी अँपला परमिशन देत असतो.
‘ही ’ सेटिंग करा आणि ठेवा सुरक्षित डेटा
- तुमच्या Google खात्यामध्ये जा.
- वरच्या डाव्या कोपऱ्यात, “Data & privacy” वर क्लिक करा.
- “History settings” अंतर्गत, “Web & App Activity” वर क्लिक करा.
- “Include voice and audio activity” शेजारी, बॉक्स अनचेक करा.
तुमच्या Android फोनसाठी हे करा :
- तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्ज अॅप उघडा.
- “Google” वर टॅप करा.
- तुमच्या Google खात्याचे व्यवस्थापन करा.
- वर, “Data & privacy” वर टॅप करा.
- “History settings” अंतर्गत, “Web & App Activity” वर टॅप करा.
- “Include voice and audio activity” शेजारी, बॉक्स अनचेक करा.
अशा प्रकारची हेरगिरी रोखण्यासाठी एखादं अॅप जर तुम्ही वापरात नसाल तर त्याचा मायक्रोफोन अॅक्सेस काढून घेणंच योग्य ठरतं. यासाठी तुम्हाला सर्वात आधी सेटिंग्समध्ये (Settings) जावं लागते. त्यानंतर अॅप मॅनेजमेंटमध्ये जाऊन तुम्हाला ज्या अॅपला मायक्रोफोन अॅक्सेस (Microphone Access) द्यायाचा नाही ते सिलेक्ट करा.
यानंतर अॅप परमिशन हे ऑपशन निवडा. यात तुम्हाला दिसेल, की त्या अॅपला कोणत्या प्रकारच्या परमिशन तुम्ही दिल्या आहेत. यामध्ये साधारणपणे फाईल अॅक्सेस (File Access), कॅमेरा अॅक्सेस (Camera Access), मायक्रोफोन अॅक्सेस, कॉलिंग अॅक्सेस (Calling Access), कॉन्टॅक्ट्स अॅक्सेस (Contact Access) या परवानग्यांचा समावेश असतो. यातील मायक्रोफोन अॅक्सेस ही परवानगी काढून घेतल्यास ते अॅप तुमचं बोलणं रेकॉर्ड करू शकणार नाही.