जळगाव,(प्रतिनिधी): जिल्हा पोलिस दलातील १५ सहायक पोलिस निरीक्षक आणि १५ पोलिस उपनिरीक्षक असे एकूण ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री काढले. बदली झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांना नवीन पदाचा पदभार तत्काळ घेण्याचे निर्देशदेखील पोलिस अधीक्षकांनी दिले आहे.
यात विनंती बदली, नव्याने हजर झालेल्या सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांच्या नवीन नेमणुका, प्रशासकीय बदलीबाबत सर्व बाबींचा विचार करून २१ ऑगस्ट रोजी रात्री आदेश काढले. यात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याचे १५ सहायक पोलिस निरीक्षक आणि १५ पोलिस उपनिरीक्षक असे एकूण ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आहे.