जामनेर,(प्रतिनिधी)आज दि.१५/०८/२०२३(मंगळवार) रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सचिन सानप आणि शिवसन्मान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वजित मनोहर पाटील यांच्या संकल्पनेतुन पहुर पोलिस स्टेशन आणि शिवसन्मान प्रतिष्ठान,जामनेर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शस्त्र प्रदर्शन पाळधी येथे उत्साहात संपन्न झाले.प्रदर्शनात पाळधी आणि परिसरातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी व नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत पोलिसांकडुन शस्त्रांची आणि पोलिस प्रशानसाची माहिती घेतली.
प्रदर्शनाचे उद्घाटन पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सचिनजी सानप साहेब यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणुन पहुर पोलिस स्टेशनचे उपनिरिक्षक संजयजी बनसोडे साहेब,मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आबासाहेब पाटील,मा.जि.प.सदस्य कैलासबापु पाटील,मा.जि.प.सदस्या प्रमिलाअक्का पाटील,मा.पं.स.सदस्या निताताई पाटील,सरपंच ॲड. प्रशांतभाऊ बावस्कर,मा.सरपंच कमलाकरभाऊ पाटील,मा.सरपंच डिगंबरभाऊ माळी,मा.सरपंच सोपानदादा सोनवणे,पोलिस पाटील वैशालीताई पाटील त्याचप्रमाणे सर्व ग्रा.पं.सदस्य,पाळधी परिसरातील सर्व शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश पाटील,हितेश जैन,अजय परदेशी,पवन पाटील,भुषण बावस्कर,नाना पाटील,मुकेश जाधव,मयुर परदेशी,अक्षय माळी,दत्ता धनगर,अंकुश पाटील यांच्यासह शिवसन्मान प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.