Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देवळाली-भुसावल शटल लवकरच पूर्व निर्धारित वेळेनुसार धावेल : रेल्वेमंत्री दानवे यांचे आश्वासन

Editorial Team by Editorial Team
August 9, 2023
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : चाळीसगाव,पाचोरा ते जळगाव दरम्यान नियमित ये -जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी धावणारी देवळाली भुसावल एक्सप्रेस (शटल) लवकरच पूर्वनिर्धारित वेळेनुसार सुरू करण्यात येईल असे आश्वासन रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे -पाटील यांनी दिल्याने प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा येथील भाजपाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह पाचोरा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे व रेल्वे बोर्डाचे चेअरमन अनिल कुमार लाहोटी यांची दिनांक ३ व ४ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान दोनही मान्यवरांनी शिष्टमंडळाला शटल रेल्वे पूर्वनिर्धारित वेळेनुसारच सुरू बाबत आश्वासन दिले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खान्देशातील प्रवाशांच्या सोयीची शटल रेल्वे सेवा म्हणजेच देवळाली-भुसावल एक्सप्रेसच्या वेळेत कोरोना काळात बदल झाला होता.परिणामी मनमाड ते भुसावल दरम्यान दररोज ये-जा करणारे प्रवासी,नोकरदार व चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले होते.प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन खासदार उन्मेषदादा पाटील व पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांचे सह पाचोरा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य तथा प्रवासी परिषदेचे जनरल सेक्रेटरी प्रभू पाटील, सल्लागार सदस्य गिरीश बर्वे ,अनिल चांदवानी, राजेंद्र बडगुजर,निलेश कोटेचा यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे व रेल्वे बोर्डाचे चेअरमन मा.अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतली.या भेटीत देवळाली-भुसावल शटल च्या मागणीबाबत लोकसभेचे अधिवेशन संपल्यावर लगेचच होणाऱ्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले. यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळी निवेदने मान्यवरांना देण्यात आली,या निवेदनावर उपरोक्त उपस्थित सदस्यांसह हिरालाल चौधरी, ॲड. प्रशांत नागणे, प्रदीपकुमार संचेती, राजू धनराळे व प्रमोद सोमवंशी यांच्यासह अनेक प्रवासांच्या स्वाक्षरी आहेत.

या दिल्ली भेटीत दोन्ही मान्यवरांनी शटल रेल्वेची आवश्यकता व उपयोगिता जाणून घेतली. शटलच्या पूर्वनिर्धारित वेळेला पर्याय म्हणून अजंता एक्सप्रेस मनमाड ऐवजी भुसावळ पासून सुरू करण्याबाबत आणि धुळे ते चाळीसगाव मेमो रेल्वे सेवा जळगाव पर्यंत वाढविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. तसेच अक्कलकोट, तुळजापूर व पंढरपूरला जाणाऱ्या खानदेशातील भाविकांसाठी साप्ताहिक धावणाऱ्या यशवंतपुरम- अहमदाबाद एक्सप्रेस ला पाचोरा व चाळीसगाव येथे थांबा देण्यात यावा अशी मागणीही शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.

अमृत भारत योजनेत पाचोरा रेल्वे स्थानकाचा समावेश
या भेटीदरम्यान खासदार उन्मेष दादा पाटील यांनी पाचोरेकरांसाठी अत्यंत आनंददायी घोषणा करत “अमृत भारत” योजनेत पाचोरा रेल्वे स्थानकाचा समावेश केल्याचे जाहीर केले. खासदार उन्मेष दादा यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील अमृत भारत योजनेत पाचोरा रेल्वे स्थानकाचा समावेश झाल्याने भारतातील अत्याधुनिक रेल्वे स्टेशन प्रमाणेच पाचोरा स्थानकाचा अभूतपूर्व विकास होऊन स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. सुमारे ३७ कोटी रुपयांचा विकास निधी यासाठी मंजूर करण्यात आल्याने रेल्वे प्रवासी, प्रवासी परिषद व पाचोरा परिसरातील जनतेने खासदारांचे कौतुक केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

9 दिवसांनंतर या राशींसाठी हातात कुबेराचा खजिना येईल, मोठी प्रगती होईल

Next Post

गत वर्षाच्या तुलनेत तीनपट ३६.६ कोटींचा नफा ;जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चे तिमाही आर्थिक निकाल जाहीर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
गत वर्षाच्या तुलनेत तीनपट ३६.६ कोटींचा नफा ;जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चे तिमाही आर्थिक निकाल जाहीर

गत वर्षाच्या तुलनेत तीनपट ३६.६ कोटींचा नफा ;जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चे तिमाही आर्थिक निकाल जाहीर

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us