जळगाव,(प्रतिनिधी): “जर तारुण्यात आर्थिक शिस्त लागली तर तरुणांचे आर्थिक भविष्य संरक्षित होऊन त्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.” असे प्रतिपादन सी.ए. सत्यम अरोरा यांनी इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी सेल व अर्थशास्त्र विभागा तर्फे आयोजित एक दिवसीय आभासी राष्ट्रीय आर्थिक साक्षरता कार्यशाळेत केले. सदर कार्यशाळेचे आयोजन नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ़ इंडिया लि. मुंबई यांच्या मार्फत “गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम” अंतर्गत केले होते.

कार्यशाळेत सी.ए. सत्यम अरोरा यांनी, आर्थिक नियोजन, एस. आय. पी., म्युचुअल फंड, शेअर मार्केट, आय.पी.ओ., बांड्स, ऑनलाइन फसवेगिरी, आभासी चलन, क्रिप्टो करेंसी, नेशनल पेंशन फंड ह्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन पिंजारी आय. एम., अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले तर कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चांद खान होते. सूत्र संचलन डॉ. बसित आयेशा यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजन करिता डॉ. करीम सालार, अध्यक्ष, इकरा शिक्षण संस्था, जळगाव व डॉ. इकबाल शाह, चेअमन, महाविद्यालय विकास समिती, यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजना करिता उप-प्राचार्य डॉ. वकार शेख, उप-प्राचार्य डॉ, तन्वीर खान, डॉ. भामरे, डॉ. इरफान शेख, डॉ. अमीन क़ाज़ी, डॉ. हाफिज शेख यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यशाळेचे संयोजक म्हणून डॉ. राजू गवरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.














