नवी दिल्ली । दिल्ली विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. विमानाला आग लागल्याच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग विमानाच्या देखभाल प्रक्रियेदरम्यान घडली. काही वेळातच यावर नियंत्रण आणण्यात आले. विमान कंपनीचे म्हणणे आहे की विमान आणि देखभाल करणारे कर्मचारी सुरक्षित आहेत. ही घटना दिल्लीच्या IGI विमानतळाची आहे, जेव्हा स्पाइस जेट विमानाच्या देखभालीदरम्यान अचानक आग लागली.
विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही घटना 25 जुलै रोजी घडली. Q400 विमानाच्या देखभालीदरम्यान, अचानक त्याच्या इंजिन क्रमांक 1 चा फायर अलार्म वाजू लागला. फायर अलार्म वाजताच कर्मचारी सक्रिय झाले. आग विझवण्यासाठी तातडीने देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कसरत सुरू केली. फायर स्टिंगविशरच्या मदतीने आग विझवण्यात आली. खबरदारी घेत अग्निशमन दलाच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या घटनेत कोणाचेही नुकसान झालेले नाही.
No. 1 engine of a Q400 belonging to SpiceJet caught fire on Bay 158 at DEL T1.
Further details awaited. pic.twitter.com/zurXrQre7k
— Vikram G Krishnan (@AvionViks) July 25, 2023
आदल्या दिवशी, DGCA ने घोषणा केली होती की ते स्पाइसजेटला “प्रगत पाळत ठेवण्यापासून” काढून टाकतील, जे गेल्या पावसाळ्यात विमानाच्या देखभालीसंदर्भात अनेक घटनांनंतर ठेवण्यात आले होते. DGCA ने 11 वेगवेगळ्या ठिकाणी बोईंग 737 आणि Q-400 सह 23 स्पाइसजेट विमानांची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
एक वर्षापूर्वी 2 जुलै 2022 रोजी स्पाइस जेट विमानाला आग लागल्याची घटना समोर आली होती. दिल्लीहून जबलपूरला जाणारे स्पाइसजेटचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच दिल्ली विमानतळावर परतले. स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने अशी माहिती दिली की, उड्डाणानंतर विमान 5 हजार फूट उंचीवर पोहोचले तेव्हा पायलटच्या केबिनमध्ये धूर दिसत होता. यानंतर विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले.