पाचोरा | पाचोरा शहरातील जळगाव चौफुली जवळील मोंढाळे रस्त्यावर बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून यात बसमधील विद्यार्थी आणि प्रवासी असे मिळून 20 ते 21 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
पाचोरा आगाराची घोसला ते पाचोरा ही मुक्कामी बस प्रवासी व विद्यार्थी घेऊन पाचोऱ्याकडे येत होती. या दरम्यान पाचोरा- मोंढाळा रस्त्यावर मौनगिरी साखर कारखान्यासमोर आज (१८ जुलै) सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. अरुंद व खराब रस्ते असल्याने बस व ट्रकचा वेग कमी असल्याने अनर्थ टळला.
हे सुद्धा वाचा…
.. हे बोगस खते आणि बियाणे गुजरातमधून येत आहे ; गिरीश महाजन
जळगाव जिल्ह्यातील दोघांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई
आज जळगावसह या जिल्ह्यात मुसळधारची शक्यता ; शासनाकडून नागरिकांनी सतर्कतेच इशारा
मुख्यमंत्र्यांनी ना. गुलाबराव पाटलांकडे सोपविली या खात्याची अतिरिक्त जबाबदारी
या अपघतात बसमधील 13 विद्यार्थी बसचालकासह 20 ते 21 जण जखमी झाल्याची घटना घडली. बस व ट्रक अपघाताचे वृत्त शहरासह तालुक्यात पसरल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक, कमालीचे भयभीत झाले व त्यांनी लगबगीने अपघातस्थळ गाठले. तसेच शैक्षणिक संस्थांचे चालक, विविध शाळातील शिक्षक, सेवाभावी संस्था संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनीही घटनास्थळी व नंतर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतल्याने प्रचंड गर्दी व गोंगाट झाला.
अपघातातील जखमी स्वराज पाटील, विवेक राठोड, गोपाल चव्हाण, नीता राठोड, रोशन परदेशी, सुमित नलवाडे, दीपक पवार, जतीन महाले, पूजा मनगटे प्रतिभा राठोड, रोशनी चव्हाण, ज्योती चव्हाण, पुष्कर पाटील, दिनेश राठोड व दिनेश चव्हाण.