राज्यातील बेरोजगार युवकांसाठी राज्य सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. राज्यात तलाठी पदांसाठी मेगाभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे.
राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात आज (23 June) शासनाच्या संकेतस्थळावर (https://mahabhumi.gov.in/mahabhumilink) प्रकाशित झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची उद्या म्हणजेच 25 जुलै 2023 (11:55 PM) आहे.
अर्ज फी :
एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार, तर आरक्षण गटासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असेल.
वयोमर्यादा :
खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही 38 असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 असणार आहे. 2 तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा 200 गुणांचा पेपर असणार आहे.
महसूल विभागातील तलाठी गट ‘क’ संवर्गातील पदांसाठी ही मोठी भरती आहे. राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील 4 हजार 644 जागांची भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2023 (11:55 PM)
अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in