जळगाव । पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली असून यासाठी चाचपणी देखील सुरु आहे. दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. नेमकं काय म्हणाले मंत्री महाजन? राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या सून म्हणून खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट कापले जाणार का असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारलं. त्यावर उत्तर देताना महाजन म्हणले की, “ऐनवेळी काहीही होऊ शकते, आजच काही सांगता येणार नाही,” असं गिरीश महाजन म्हणाले. हे पण वाचा.. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ ; शिवसेनेच्या जाहिरातबाजीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण महिलांनो सावधान, तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक ; जळगावच्या महिलेला लावला ४२ हजाराचा चुना राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार ; वाचा आजचं राशीभविष्य राज्यातील राजकीय घडामोडीला वेग : मुख्यमंत्री शिंदेनी शिवसेनेच्या सर्वच आमदार, खासदार आणि नेत्यांची बोलावली बैठक उमेदवारीबाबत भाजपचे निर्मय हे हायकमांड घेत असतं. गेल्या काही वर्षांत पाहिलं तर भाजपचे माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे असतील, आमदार स्मिता वाघ असतील, तसेच खासदार उमेश पाटील ऐनवेळी कशा पद्धतीने या उमेदवारांची तिकिटं कापण्यात आली.” “त्यामुळे हा भाजपच्या हायकमांडचा निर्णय आहे. ऐनवेळी काहीही होऊ शकतं, असं म्हणत रक्षा खडसे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. गिरीश महाजन यांच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिक्रियेवरुन असं दिसून येत आहे की भाजपमध्ये असताना एकनाथ खडसे यांचं तिकीट कशाप्रकारे कापलं होतं. आता नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांचं तिकीट कट होतं का की त्यांना पुन्हा उमेदवारी मिळते, अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.