मुंबई : शेतकरी ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करीत होते तो मान्सून अखेर महाराष्ट्रात रविवारी दाखल झाला. हवामान खात्यानं राज्यात पुढच्या 3 ते 4 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्याना यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.
कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला इथे आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
या सोबतच राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण विदर्भात 15 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. आज हवामान विभागाकडून महाराष्ट्रात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्येही १३ ते १५ जून या कालावधीत हलक्या सरींचाच अंदाज आहे.