महाराष्ट्रात केंद्रप्रमुख या पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाअंतर्गत ही भरती केली जाणार असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 15 जून 2023 असणार आहे.
या भरती मार्फत तब्बल 2384 जागा भरल्या जातील.
पदाचे नाव : केंद्रप्रमुख
कोण अर्ज करू शकतो?
फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून ३ वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : या परिक्षेसाठी सर्व संवर्गासाठी ९५० तर दिव्यांग उमेदवारांसाठी ८५० रुपये परिक्षा शुल्क ठरविण्यात आले आहे
वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 41,800 – 1,32,300 रुपये प्रतिमहिना पगार मिळेल.