पुणे : महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असून कधी पावसाच्या सरी, तर उन्हाचा कडाका जाणवत आहे. उकाड्यामुळे लोक हैराण झाले असून यापासून कधी सुटका होईल, याची वाट पाहत आहे. अशातच राज्यातील काही ठिकाणी आज विजांसह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच पुढील तीन दिवसात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे.
अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यात बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. तसेच स्थानिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून दुपारनंतर ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचीही शक्यता आहे. मोसमी पाऊस सक्रिय होईपर्यंत पुढील तीन दिवस विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
हे पण वाचा..
खाली कार्पेट, वर रस्ता, ठेकेदाराने केलेल्या बनावटरस्त्याचा पर्दाफाश ; व्हिडीओ व्हायरल
पोरांची धाकधूक वाढली ! आज दुपारी जाहीर होणार 10वी चा निकाल, कुठे आणि कसा पाहाल?
बदलत्या हवामानात मुले पडू शकतात या 3 आजारांना बळी
राज्यात कुठे कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचाही अंदाज आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार येत्या १ जून रोजी मान्सून केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहचू शकतो.