अमळनेर : तालुक्यातील लोण येथील सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाचा मंगळवारी अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातात मृत्यू झाला. लिलाधर नाना पाटील (वय ४२) असं मृत जवानाचं नाव असून त्यांचं पार्थीव 18 मे रोजी त्यांच्या मूळ गावी लोण येथे आणण्यात येणार आहे. याठिकाणी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
लोण (ता. अमळनेर) येथील लिलाधर नाना पाटील (वय ४२) हे आसाममधील गुवाहाटी येथे सैन्यदलात नोकरीला होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी दोन वर्षे वाढवून घेतले होते. आसामहून ४०० किलोमीटरवर असलेल्या अरुणाचल प्रदेशात त्यांची बदली झाली होती. आर्मीच्या ट्रकमध्ये २० जणांची तुकडी नेली जात होती. लिलाधर हे मागे बसले होते.
हे पण वाचा..
निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली 3 लाखांची भेट! आता खात्यात पैसे येतील
सुवर्णसंधी..! ECHS मार्फत जळगाव आणि बुलडाणामध्ये नवीन भरती, आठवी ते पदवीधरांना संधी..
धक्कादायक! मंत्रीपद मिळेल, पण.. राज्यातील ६ आमदारांना घातला कोट्यवधींचा गंडा
या गाडीचे अचानक मागचे फाटक तुटल्याने लीलाधर पाटील खाली पडले. दगडाचा मार लागल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, लीलाधर पाटील यांचे पार्थीव गुरुवारी (ता. १८) सकाळी लोण येथे आणण्यात येणार असून, शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आईवडिल, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.