जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सियसच्या वर पोहोचला आहे. उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. यात जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे सततच्या तापमान वाढीमुळे जळगावकर अक्षरश: हैराण झाले आहेत.
जळगावमध्ये पारा 44.6 अंशावर पोहोचला होता. या वर्षीचे हे राज्यातील सर्वोच्च तापमान ठरलं आहे. तर आज राज्यातील काही भागात हवामान विभागाने उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान 40 अंशांच्या वर आणि सरासरीच्या तुलनेत तापमान 4.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त वाढले असल्यास उष्णतेची लाट आली असं समजले जाते. राज्यात गुरुवारी जळगावात 44 अंशांच्या वर तापमान होतं. तर अकोल्यात 43.5 आणि धुळ्यात 42.0 अंश सेल्सियस तापमान नोंद झालं. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या वर होता.
हे पण वाचा..
सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरले, नंतर बाहेर आलेच नाही : पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
पदवी उत्तीर्ण आहात का? हिंदुस्तान फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लि.मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स
अरे वा..! गॅसचा त्रास संपणार ; आता फुकटात जेवण बनवणार, दरमहा होणार बचत
कमाल तापमान 40 अंशांच्या वर आणि सरासरीच्या तुलनेत तापमान 4.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त वाढले असल्यास उष्णतेची लाट आली असं समजले जाते. राज्यात गुरुवारी जळगावात 44 अंशांच्या वर तापमान होतं. तर अकोल्यात 43.5 आणि धुळ्यात 42.0 अंश सेल्सियस तापमान नोंद झालं. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या वर होता.
मोखा चक्रीवादळ आज तीव्र होणार
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोखा चक्रीवादळ आज तीव्र होणार आहे. मच्छीमार, जहाजे, बोटींनी रविवारपर्यंत बंगालच्या उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्रात न जाण्याचा सल्ला विभागाने दिला आहे. चक्रीवादळामुळे त्रिपुरा आणि मिझोराममध्ये शनिवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय रविवारी नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
















