परभणी : परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये चौघांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
नेमकी घटना काय?
परभणीतील सोनपेठ तालुक्यातल्या भाऊचा तांडा शिवारामधील मारूती राठोड यांच्या शेतात सेप्टिक टँकची स्वच्छता करण्यासाठी रात्री मजूर आले होते. ते स्वच्छता करायला टाकीत उतरले पण बाहेर आलेच नाहीत. रात्रीच्या अंधारामुळे हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे.
मृताचे नाव :
शेख सादेक वय ४५, शेख शाहरुख वय २०, शेख जुनेद २९, शेख नाविद वय २५, शेख फिरोज वय २५ अशी मृतांची नावे आहेत. यामध्ये शेख साबेर हा जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाच जणांचे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. हा प्रकार कसा घडला? याचा तपास करण्यासाठी जखमी व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

