सांगली : एकीकडे राज्यातील सत्ता संघर्षावरील निर्णय अवघ्या काही तासात लागणार असतानाच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीने पाटील यांना उद्याच हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
आयएल आणइ एफएस कंपनीच्या व्यवहारांची यापूर्वीच ईडीकडून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जातं. ही कंपनी दिवळखोरीत होती. या कंपनीत मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचं दिसून आलं आहे.
हे पण वाचा..
मन सुन्न करणारी दुर्देवी घटना! मुलाच्या हळदीचा कार्यक्रम पाहिला अन् आईने सोडले प्राण
10वी ते पदवीधरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मुंबई येथे 5182 पदांची जम्बो भरती सुरु
मोठी बातमी! निकाल येण्याआधीच विधानसभेचे उपाध्यक्ष नॉट रिचेबल.. राज्यात खळबळ
या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचाही संश आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अरुण कुमार साहा यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही केली होती. याच प्रकरणात आता जयंत पाटील यांना नोटीस बजावली गेल्याचं सांगितलं जात आहे.