नाशिक : आज सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे. निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार की ठाकरे गटाच्या बाजूने लागणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र निकालाच्या दिवशीच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल झाल्याने खळबळ उडाली आहे.
झिरवळ यांचे सकाळपासून दोन्ही फोन बंद आहेत तर ते गावच्या घरीही उपस्थित नाहीत. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या दिवशी नॉट रीचेबल असल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
राज्याच्या सत्ता संघर्षावर आज दुपारी 12च्या आत निकाल येणार आहे. असं असताना झिरवळ नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
या16 आमदारांच्या भवितव्याचा फैसला
1) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) संदीपान भुमरे
4) संजय शिरसाट
5) तानाजी सावंत
6) यामिनी जाधव
7) चिमणराव पाटील
8) भरत गोगावले
9) लता सोनावणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) अनिल बाबर
13) महेश शिंदे
14) संजय रायमुलकर
15) रमेश बोरणारे
16) बालाजी कल्याणकर