जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी आपल्याच सरकार विरोधात खळबळजनक उद्गार काढलं आहे. आमचं सरकार आल्यापासून लोकच नाही तर देवही विस्कळीत झाले आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले. धरणगाव येथील चर्मकार समाजा मेळाव्यात प्रसंगी ते बोलत होते.पण गुलाबराव पाटील यांनी आपल्याच सरकारविरोधात असं विधान का केलं? अशी चर्चाही यावेळी रंगली आहे.
यावेळी मेळावा सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचा धागा पकडून गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं. आता हा अवेळी पडणारा पाऊस आहे. त्यामुळे आम्ही तर हे सरकार आल्यापासून पंचनाम्यामध्येच गुंग आहोत. इकडे आल्यानंतर ब्रेक के बाद पण गारपीट सुरू आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील राजीनामा नाट्यावरही भाष्य केलं. पक्ष जे सांगेल तेच नेता करत असतो, तेच काम शरद पवारांनी केलंय. शेवटी ती त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे, त्यांच्या पक्षाला जे वाटलं ते त्यांच्या कोअर कमिटीने केलं, असं त्यांनी सांगितलं.
हे पण वाचा…
WHO ची सर्वात मोठी घोषणा..! ‘कोविड-19 ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी नाही’
घरकाम करणार्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी ; पुण्यात IPS अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
भारतीय रेल्वेत नोकरीत नोकरीची सुवर्णसंधी..! 10वीसह ITI उत्तीर्णांसाठी मोठी भरती
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाचे दर 15-20 रुपयांनी स्वस्त
राष्ट्रवादीतल्या घडामोडी ही शेवटी त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे, त्यांच्या पक्षाला जे वाटलं ते त्यांच्या कोअर कमिटीने केलं. त्याचं स्वागत शरद पवारांनी केलंय. शेवटी नेता हा पक्ष आणि कार्यकर्त्यांना बांधील असतो. तो असलाच पाहिजे. तेच शरद पवार यांनी केलं आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.