Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरोग्य निरिक्षकास न्यायालयाने सुनवली ५ वर्ष ६ महिने कारावासाची शिक्षा व २५ हजार रूपये दंड

najarkaid by najarkaid
May 4, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनीधी)-  कोविड कालावधीत पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या भडगाव रोडवरील शासकिय निवासस्थाना समोर नगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक व दोन व्यक्तींनी मद्यप्राशन करून मुख्याधिकारी यांना अरेरावीची भाषा करत केलेल्या वर्तनाबाबत मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांच्या फिर्यादिनुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात आज ३ मे रोजी मा. पाचोरा न्यायालयाने गुन्ह्यातील आरोपी आरोग्य निरिक्षक धनराज पाटील यांना एक कलमानुसार ३ वर्ष शिक्षा व २० हजार रूपये दंड, दुसर्‍या कलमात २ वर्ष शिक्षा व ५ हजार रूपये दंड. तिसर्‍या कलमानुसार ६ महिने शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेतील एक आरोपी मयत झाले असुन दुसरे आरोपी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

याप्रकरणी मुख्याधिकारींनी दिलेली फिर्याद अशी की, कोविड – १९ काळात लोकांनी एकञ येण्या संदर्भात तसेच दारूबंदी संदर्भात जिल्हाधिकारी यांचे वेळोवेळी आदेश असतांना पाचोरा नगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक धनराज पाटील यांच्यासह गौतम निकम व एस. टी. सावळे हे तिघे इसम २२ एप्रिल २०२० रोजी नगरपालिकेच्या मुख्यानधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांचे भडगाव रोडवरिल शासकिय विश्राम गृहासमोर अनधिकृतपणे प्रवेश करून मद्य प्राशन करित होते. दुपारी दिड वाजेच्या सुमारास शोभा बाविस्कर ह्या शासकिय निवास स्थानी भोजनासाठी आले असता. शिपाई नितेश रमेश बाविस्कर हे घाबरत, पळत आले व म्हणाले की, वरील तीन व्यक्ती हे अरेरावीची भाषा करित आहेत. असे सांगितल्या नंतर त्यांनी आतमध्ये जाउन पाहीले असता. त्यांच्या ताब्यातील शासकिय विश्राम गृहाच्या पोर्चमध्ये धनराज पाटील, एस. टी. सावळे व गौतम निकम हे तिघेही मद्यप्राशन करित होते. मला पाहुन एस. टी. सावळे व गौतम निकम हे घटनास्थळाहुन पळुन गेले. यावेळी धनराज पाटील यांची चारचाकी क्रं. एम. एच. १९ सी. यु. १८५१ ही सुध्दा माझ्या ताब्यात असलेल्या शासकिय निवासस्थानाच्या आवारात लावली होती. त्यानंतर मी त्यास बोलले की, तुम्हाला असे माझ्या बंगल्यासमोर दारू पितांना लाज वाटत नाही का ? त्यानंतर मी घरात प्रवेश केला असता. धनराज पाटील हे माझ्या मागे मागे येत होते. त्यास मी सांगितले की, मागे येउ नको तरीसूध्दा ते मद्यधुंद अवस्थेत असतांना धनराज पाटील हे मागे येत होते. त्यावेळी महाराष्ट्रात सातीचे संसंर्गजन्य रोग पसरत असतांना त्याची जाणिव असतांना तिघांनी माझ्या परवानगी शिवाय शासकिय निवासस्थानाच्या आवारात गुन्हा करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. म्हणुन पाचोरा पोलिस स्टेशनला २२ एप्रिल २०२० रोजी भाग ०५ गु. र. नं १७६ / २०२० भादवी कलम ३५४D, ४५२, ४४८, २७०, २६९, १८८, ३४ व मुंबई दारुबंदी अधिनियम १९९८ चे कलम ८५ प्रमाणे गुन्हा नोंदविला होता.

सदर गुन्ह्यात आज पाचोरा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. जी. बी. औंधकर यांनी आज निकाल दिला असुन यात आरोपी एस. टी. सावळे मयत असल्याने अॅबैट समरी केले होते. आरोपी गौतम निकम यांना या प्रकरणातुन निर्दोष करण्यात आले आहे. आरोपी धनराज पाटील यांना CRPC कलम २४८ (२)प्रमाणे दोषी ठरविले असुन त्यांना भादवु कलम ३५४ D मध्ये तिन वर्ष शिक्षा व २० हजार रूपये दंड, भादवी कलम ४५२ मध्ये २ वर्ष शिक्षा व पाच हजार रूपये दंड.भादवी कलम ४४८ मध्ये सहा महीने शिक्षा अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक जळगाव, अप्पर पोलिस अधिक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलिस अधिकारी पाचौरा, प्रभारी पोलिस अधिकारी पाचोरा पोलिस स्टेशन, महिला पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी केला असुन या खटल्यात सरकारी अभियोक्ता रमेश माने यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पो. हे. का. दिपक पाटील व केसवाच म्हणुन विकास सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.या निकालामुळे पाचोरा शहरासह नगरपालिका विभागातखळबळ उडाली. सदर प्रकरणात आरोपीस वरील न्यायालयात दाद मागण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ही घरगुती वस्तू चेहऱ्यावर लावा, चेहऱ्याच्या समस्यांपासून आराम मिळेल

Next Post

नाशिक विभागातील खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषिमंत्र्यांनी घेतला आढावा

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
नाशिक विभागातील खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषिमंत्र्यांनी घेतला आढावा

नाशिक विभागातील खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषिमंत्र्यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us