नवी दिल्ली : केंद्र सरकारने पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या १४ मेसेंजर अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये Bchat देखील समाविष्ट आहे. इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय IT मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
सध्या ऑनलाईन स्कॅमच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये नागरिकांचा पर्सनल डेटा चोरला जातोय. तसेच अन्य वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक होत आहे. फसवणूकीच्या अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय.
याआधी भारताने कारवाई करताना पाकिस्तानमधून चालणाऱ्या अनेक सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घातली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील सक्रिय दहशतवादी या अॅप्सच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या मालकांशी संपर्क साधत होते.
हे पण वाचा…
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडर तब्बल ;एवढ्या; रुपयांनी झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन दर
4थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी तेही महाराष्ट्रात ; 52 हजारापर्यंतचा पगार मिळेल
बोदवड: राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकल्या ; खडसेनां मोठं यश
बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानी अॅप्समध्ये Bechat, Cripwiser, Inigna, SafeSwiss, Vikrama, Mediafire, Briar, Nandbox, Conion, imo, Element, Second Line आणि Jangi and Therma यांचा समावेश आहे.