जळगाव – सर्वोच्च न्यायलयाने 24 तासात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी संख्या नसल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी, सेना, कांग्रेस महाआघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याने या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
शहरातील तिन्ही पक्ष कार्यालयात मंगळवारी दुपारनंतर गजबज बघायला मिळाली मात्र मंगळवारी 26/11 असल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष करणे टाळत साधेपणाने आनंद साजरा करणे पसंत केले. दरम्यान गेल्या 2 दिवसापासून भाजपा कार्यालयात असलेली गजबज मात्र मंगळवारी दिसून आली नाही. गेल्या दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना सोबत घेत फडणवीस यांनी बहुमत नसताना देखिल भल्या पहाटे राजभवनावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. दरम्यान अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा विरोध असल्यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात मोठे घमासान सुरु होते. या प्रकरणात कायदेशीर पातळीवर देखील लढाई सुरु होती.
मंगळवारी सुप्रीम कोर्टाने बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत संख्याबळ सिद्ध करण्याचे आदेश दिल्यांनतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला . त्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष या स्थितीकडे लागून होते. दरम्यान जळगाव जिल्ह्यात भाजपाचे 3 आमदार निवडून आले आहेत. तर सेनेचे 4 आमदार निवडून आलेलं आहेत. राष्ट्रवादी चा 1 तर काँग्रेस चा 1 आमदार निवडून आले आहेत. परपरागत भाजपची असलेली मुक्ताई नगरच्या जागेवर राष्ट्रवादीचा पुरस्कृत उमेदवार निवडून आला आहे. मात्र राज्यातील सत्ता नाट्यांमुळे सर्व आमदारांचा शपथ विधी देखील बाकी होता . त्यातच अजित पवार यांनी केलेल्या बंडात अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील हे गुरफटले गेल्यामुळे जळगाव जिल्हा मात्र या संपूर्ण घडामोडीत चांगलाच चर्चेत राहीला.