मुंबई – सत्तास्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याने अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला होता. अजित पवारांना सोबत घेत शपथ घेतल्याने, फडणवीसांवर टीका सुरू झाली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत का गेलो हे योग्य वेळ आल्यावर, योग्य गोष्टी सांगेन असे म्हणत सस्पेन्स वाढविला आहे.