जर आपण घरबसल्या कोणता व्यवसाय करावा याबाबत माहिती घेणार आहोत… सर्वात आधी हे लक्षात घ्या की,व्यवसाय कोणताही असो लहान असो किंवा मोठा असो तो एक व्यवसाय असतो. वाढत्या महागाईने प्रत्येकाचं बजेट वाढलेलं दिसतं त्यामुळं दोन पैसे जास्त कामावले गेले पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं म्हणूनच जास्त करून लोक व्यापार करण्यास नेहमी पसंत करत आहेत.स्वतःच्या उभ्या केलेल्या व्यवसायामध्ये तुम्ही स्वतःच एक बॉस असता व तुम्हाला कोणाच्याही दुसऱ्याचा हाताखाली काम करावे लागत नाही.दरम्यान नवीन व्यवसायासाठी मार्केटच्या दुकानाचे न परवडणारे भाडे घरगुती व्यवसाय करण्यास उत्तम पर्याय आहे.चला तर मग जाणून घेऊया घरगुती व्यवसाय कोणता करावा.
1. tuition classes : ज्या महिला गृहिणी उच्च शिक्षित आहेत त्या महिला आपल्या प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग tuition classes घेवू शकतात.१ ली ते १० वी मुला मुलींना ट्युशन क्लास घेणे तेही आपल्या फावल्या वेळेत… महिला असो किंवा पुरुष दोघं सुद्धा tuition classes चालवून चांगले उत्पन्न मिळवू शकतात,अनेक जण घरगुती क्लासेस सुरु करून आपला शैक्षणिक क्षेत्रात नावं कमवतांना दिसत आहे.
2.Music Teaching : ज्यांना संगीताची खुप आवड आहे तसेच त्यांना त्याचे पुरेपुर ज्ञान देखील आहेत असे महिला, पुरुष आपल्या घरातच संगीताचे क्लासेस देखील घेऊ शकतात.आणि जसजशी आपल्या क्लासमधील संगीत शिकत असलेल्या मुला मुलींच्या संख्येमध्ये वाढ होत जाईल.आपण आपल्या त्या छोटयाशा क्लासला एक मोठे म्युझिक टिचिंग सेंटर देखील बनवु शकतो.
3. Accounting : अशा गृहिणी ज्यांचे काँमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेत शिक्षण झालेले आहे आणि त्यांचे अकाऊंटचे ज्ञान खुप उत्तम आहे.अशा महिला घरबसल्या वेगवेगळया कंपन्यांसाठी त्यांचे अकाऊंट सांभाळण्याचे त्यांचे बँलन्स शीट तयार करण्याचे काम करू शकतात.यासाठी फक्त आपल्याला अशा कंपनीशी
आँनलाईन जाँबशी संबंधित वेबसाईटशी आँनलाईन संपर्क साधुन तिथे आपला बायोडाटा पाठवायचा असतो.ज्या कंपनीला अकाऊंट किपर हवा असेल त्या आपल्याशी नक्की संपर्क साधत असतात.मग आपण आपल्याला हव्या त्या कंपनीचे अकाऊंट बघण्याचे काम करू शकतो.
4. Online ticket booking : अशा महिला ज्यांना इंटरनेटचे चांगले ज्ञान आहे आणि त्यांना आँनलाईनची सर्व कामे जमतात अशा महिला इतरांना घरबसल्या आँनलाईन टिकिट बुक करून देणे तसेच लाईट बिल भरूण देणे अशी आँनलाईन कामे करून एक चांगले साईड इन्कम प्राप्त करू शकतात.फक्त लोकांना ही सेवा देण्यासाठी आपल्याकडे आपला स्वताचा एक कंप्युटर तसेच लँपटाँप असणे गरजेचे असते आणि त्यात चांगले इंटरनेट कनेक्शन असणे देखील आवश्यक असते.सोबतच कागदपत्रांची प्रिंट काढण्यासाठी आपल्याकडे एक प्रिंटरही असावे लागते.
5. Conducting online surveys आज मार्केटमध्ये अशा खुप कंपन्या उपलब्ध आहेत ज्यांना आपल्या कंपनीत सर्वे करण्यासाठी आँनलाईन कामे करत असलेल्या मुला मुलींची घरगृहिणींची आवश्यकता असते.अशा कंपनींसाठी आँनलाईन सर्वे करण्याचे काम देखील महिला तसेच घरगृहिणी करू शकतात.
6. Doing business selling clothes online : आज पाहावयास गेले तर आपणास गेले तर आपणास दिसुन येते की बहुतेक महिला ह्या आँनलाईन कपडे विक्री करण्याचा व्यवसाय करता आहेत.फक्त ह्यासाठी आपल्याला आपला सोशल मिडियावर भरपुर लोकांशी संपर्क निर्माण करावा लागतो.वेगवेगळे गृप तसेच पेजेस बनवुन आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करावी लागते.आँनलाईन आपल्या मालाचे फोटो पोस्ट करावे लागतात ज्यालाही कपडे आवडले तो आपल्याशी संपर्क साधून कपडे मागवित असतो.मग आपल्याला त्या दिलेल्या पत्यावर मालाची डिलीव्हरी करायची असते.
Small Business Ideas : लहान स्वरूपाचे व्यवसाय
1. जेवणाचा डब्बा तयार करणे, पोहचविणे : अशा स्त्रिया ज्यांना स्वयंपाक बनविण्याची खुप आवड आहे.आणि त्यांना पाककलेचे चांगले ज्ञान अवगत आहे अशा स्त्रिया आपल्या कलेचा वापर करून इतरांसाठी भोजन बनविण्याचा व्यवसाय करून अशा लोकांना तसेच मुला मुलींना ही सेवा देऊ शकतात जे पुरुष,मुले मुली नोकरीसाठी तसेच शिक्षणासाठी बाहेरगावी राहत आहेत आणि त्यांची जेवणाची गैरसाय होते आहे.
2. लहान मुले सांभाळण्याचा व्यवसाय : बहुतेक महिला ह्या एक तर नोकरदार असतात किंवा त्यांचा स्वताचा उद्योग व्यवसाय असतो त्यामुळे अशा महिला आपल्या लहान मुला मुलींची काळजी घेण्यासाठी एखादी स्त्री शोधत असतात जी त्यांच्या अनुपस्थितीत देखील त्यांच्या लहान बाळाची व्यवस्थित काळजी घेईन.अशा आपल्या आजुबाजु वास्तव्यास असलेल्या नोकरदार तसेच उद्योजक महिलांसाठी आपण त्यांची मुले सांभाळण्याचे काम करू शकतात.ह्या व्यवसायासाठी आपल्याला फक्त लहान मुलांसाठी घरात खेळणी वगैरे ठेवणे गरजेचे असते.
3. मेहंदी लावण्याचा व्यवसाय : ज्या महिलांना चांगली मेहंदी काढता येते अशा महिला आपल्या घरातच एक मेहंदी लावण्याचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात.आपल्या आजुबाजुच्या महिलांना सण उत्सव तसेच विशेष कार्यप्रसंगी हातात मेहंदी काढुन देण्याचे काम देखील आपण करू शकतात.त्यासाठी आपल्याला फक्त आपल्या घराबाहेर एक छोटीशी पाटी लावावी लागेल की आमच्याकडे सर्व प्रकारच्या डिझाईनच्या मेहंदी काढुन मिळतील मग आजुबाजुच्या स्त्रियांना जसजशी माहीती होईन तसतशा त्या आपल्याकडे मेहंदी काढुन घेण्यासाठी येत जातील.
4. दागिणे बनविण्याचा व्यवसाय : दागिणे बनविणे हा एक असा व्यसाय आहे जो बहुतेक महिला आपल्या घरी बसुन देखील करू शकतात.फक्त यासाठी आपल्याला आर्टिफिशल दागिणे असणे खुप गरजेचे आहे.आणि आपल्याला जर आर्टिफिशल दागिणे कसे बनवतात हे माहीत नसेल तसेच त्याचे ज्ञान नसेल तर आपण युटयुबवर व्हिडिओ बघुन देखील काही दिवसांतच आँनलाईन ही कला शिकु शकतो.किंवा एखादी ट्रेनिंगसुदधा घेऊ शकतो.
महिलांसाठी विकेंड व्यवसाय :
1. कुकिंकचे क्लासेस घेणे : बहुतेक महिला अशा असतात ज्यांना कुकिंगची फार आवड असते.आणि त्यांना नवनवीन स्वादिष्ट पदार्थ बनवायला आणि इतरांना खाऊ घालायला खुप आवडत असते.अशा महिला आपल्या अंगी असलेल्या ह्या कौशल्याचा वापर इतरांना कुकिंग शिकविण्यासाठी करू शकतात.ज्यात ते नवनवीन पदार्थ बनवायला इतरांना देखील शिकवू शकतात.आणि हे कुकिंगचे क्लास आपण हप्त्यातुन एकदा तसेच दोनदा घेऊ शकतो.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे फक्त स्वयंपाकघर आणि काही भांडयांची आवश्यकता असते.
2. कंप्युटर दुरुस्त करणे : अशा महिला ज्यांना कंप्युटरचे उत्तम ज्ञान प्राप्त आहे.त्यांना साँपटवेअर तसेच हार्डवेअरचे चांगले उत्तम ज्ञान आहे.अशा महिला घरातुनच आपला कंप्युटर दुरुस्त करण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात.
3. युटयुब चँनल सुरू करणे : बहुतेक महिला आपले ज्ञान आपला,अनुभव आपल्या अंगी असलेले एखादे कौशल्य इतरांसोबत आपले स्वताचे एक युटयुब चँनल सुरू करून शेअर करू शकतात.त्यांना ती कला शिकवू शकतात.आपले प्राप्त केलेले ज्ञान इतरांसोबत वाटुन घेऊ शकता.आपले अनुभव इतरांसोबत शेअर करू शकता.अशा पदधतीने आपण आपले स्वताचे चँनल सुरू करून आपल्याला जे उत्तम येते ते आपण इतरांसोबत शेअर करून युटयुबद्वारेपैसे कमवू शकतो.फक्त यासाठी आपल्याला आपले चँनल आधी माँनीटाईज करावे लागते.मग त्यावर ज्या अँड येतात त्याचे पैसे आपल्याला मिळत असतात.
4. ट्रान्सलेटींग : अशा महिला ज्यांना चांगले भाषांतर येत असते ज्या एका भाषेतील मजकुर दुसरी भाषेत भाषांतरीत तसेच अनुवादीत करू शकतात.अशा महिला ट्रान्सलेटर म्हणुन देखील काम करु शकतात.आणि हा व्यवसाय महिला घरबसल्या आँनलाईन देखील करू शकतात.अशा खुप वेबसाईट तसेच लेखक असतात ज्यांना आपले आर्टिकल एका भाषेतुन दुसरी भाषेत ट्रान्सलेट करायचे असते ज्यासाठी त्यांना ट्रान्सलेटरची आवश्यकता असते.
5. फ्रिलान्स रायटिंग करणे : आज असे खुप ब्लाँग आहेत ज्यात ब्लाँगर्सला स्वता आपल्या ब्लाँगसाठी आर्टिकल लिहायला वेळ भेटत नसतो.त्यामुळे त्यांना आपल्या ब्लाँग वेबसाईटसाठी आर्टिकल लिहायला एक कंटेट रायटर हवा असतो जो त्यांना हव्या त्या विषयावर रोज आर्टिकल लिहुन देण्याचे काम करत असतो.शा ब्लाँगरसाठी रिकाम्या वेळात आर्टिकल लिहुन आपण चांगले इन्कम प्राप्त करु शकतात.
ग्रामीण भागातील महिला तसेच गृहिणींसाठी व्यवसाय :
1. घरगुणी लोणचे बनवण्याचा व्यवसाय : आज खूप महिला तसेच पुरूष जण आहेत जे नेहमी जेवणात भाजी पोळी सोबत तोंडी लावण्याकरता लोणचे देखील घेत असतात.पण त्यांच्या घरात दोघे नवरा बायको कामाला जात असल्याकारणाने नेहमी लोणचे तयार केले जात नसते त्यामुळे ते बाहेरून बाजारातुन लोणचे आणत असतात.अशा लोकांसाठी घरगुती लोणचे तयार करून ते घरपोच दिले जाण्याची सेवा देऊन आपण आपला स्वताचा घरगुती लोणचे आणि पापड सेवा वगैरेचा चांगला व्यवसाय सुरू करू शकतो.
2. मिठाई विकण्याचा व्यवसाय करणे : आज वेगवेगळया कार्यक्रमांसाठी प्रत्येक ठिकाणी मग ते लग्न समारंभ असो किंवा इतर कोणताही समारंभ असो मिठाई ही लागतच असते.कारण मिठाई ही आपल्याला प्रत्येकाला स्वीट मध्ये आवडत असते.म्हणुन नेहमी कोणताही कार्य प्रसंग असल्यावर आपण जेवणाच्या ताटात मिठाईचा समावेश पहिले करत असतो.अशा वेगवेगळया कार्य प्रसंगी स्वादिष्ट मिठाई बनवुन देण्याचे काम देखील महिला करू शकतात.
3. स्वताचे एखादे छोटेसे दुकान सुरू करणे : घरगृहिणी तसेच महिला आपल्या घरातच स्वताचे एखादे छोटेसे दुकान सुरू करू शकतात.ज्यात त्या आपल्याला दैनंदिन जीवणात लागत असलेल्या वस्तु,किराणा,भाजीपाला आपल्या घरात ठेवू शकतात आणि तोच आजुबाजुच्या लोकांना विकु शकतात.याच्याने इतर लोकांचा बाजारात वस्तु विकत घेण्यासाठी जाण्याचा त्रासही कमी होईल आणि आपलाही एक साईड इन्कम बिझनेस चालु होऊन जाईल.
4. मेणबत्ती बनवण्याचा तसेच विकण्याचा व्यवसाय : मेणबत्ती ही एक अशी वस्तु आहे जीची गरज आपल्याला आपल्या दैनंदिन जीवणात नेहमी पडत असते.घरात लाईट गेल्यावर घरात जेव्हा सर्वत्र अंधार झालेला असतो तेव्हा प्रकाशासाठी आपण घरात मेणबत्ती लावत असतो.तसेच वेगवेगळया साज सजावटीच्या कामासाठी तसेच धार्मिक ठिकाणी देखील मेणबत्तीची आवश्यकता भासत असते.म्हणून हा सुदधा एक चांगला उत्तम व्यवसाय आहे जो महिला तसेच गृहिणी करू शकतात.फक्त यासाठी आपल्याला मेणबत्ती कशी तयार केली जाते हे शिकावे लागेल.
स्त्रियांसाठी किंवा गृहिणींसाठी कमी खर्चात घरी करता येणारे व्यवसाय । Low Investment Business Ideas In Marathi
1. केक बनविणे : आज कुठेही मोठया कार्यक्रमात मग तो कोणाचा वाढदिवस असो किंवा इतर कोणताही आनंदाचा कार्यक्रम असो तिथे केक आपल्याला आवर्जुन पाहायला मिळत असतो.अशा मोठमोठया वाढदिवसाच्या कार्यक्रमांसाठी घरगुती केक बनवुन देण्याचे काम देखील महिला करू शकतात.ह्यात आपण सुरूवातीला आपल्या घराच्या आजुबाजुच्या लोकांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम असला तर त्यासाठी केक बनवुन देण्याचे काम करू शकतो.मग जसजशी व्यवसायात वृदधी होईल तसतसे आपण मोठमोठया दुकानांसाठी केक बनवुन देण्याचे काम करु शकतो.
2. वधुवरसुचक मंडळ : वधुवर सुचक मंडळ हा सुदधा महिलांसाठी एक चांगला व्यवसाय आहे जो महिला घरबसल्या देखील करू शकतात.फक्त यासाठी आपल्याकडे अशा काही लग्न इच्छुक वर आणि वधु यांची यादी असणे गरजेचे असते जे आपल्यासाठी एक जीवनसाथी शोधत असतात.मग आपण त्या दोघांची भेट घडवून देऊन त्यांचे लग्न जुळवुन देऊन चांगले कमिशन प्राप्त करू शकता.
3. कार्यक्रमाचे नियोजन करणे : आज बहतेक महिला तसेच मुली ह्यांना वेगवेगळया कार्यक्रमाचे नियोजन करायला खुप आवडत असते.आणि अशी आवड असलेल्या महिला इतरांच्या घरी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचे जसे की लग्न,नव वर्षाचा कार्यक्रम यांचे नियोजन करून एक चांगली कमाई करु शकतात.
4. ब्युटी पार्लर : ब्युटी पार्लर हा एक असा व्यवसाय आहे जो महिला तसेच गृहिणी आपल्या घरातच सुरू करू शकतात.फक्त हा व्यवसाय करण्यासाठी आपणास ब्युटी पार्लर मध्ये जी कार्ये केली जातात जसे की चेहरा साफ करणे,केस कापणे,फेशल करणे इत्यादी कामांचे आपल्याला आधी प्रक्षिक्षण घ्यावे लागेल मग आपण आपले स्वताचे एक ब्युटी पार्लर सुरू करू शकतात.
5. शिवणकाम करणे : जर आपणास शिवणकाम येत असेल तर आपण आपल्या घरातच शिवणकामाचा व्यवसाय सुरू करू शकतात.ज्यात आपण आपल्या घराच्या आजुबाजुच्या परिसरातील पुरूष,महिला लहान मुले मुली यांचे फाटलेले कपडे शिवण्याचे काम करू शकतात.यासाठी आपल्याला एक शिवणयंत्र लागत असते त्याचा खर्च आपल्याला करावा लागत असतो.
नोकरदार तसेच व्यवसायिक महिलांसाठी व्यवसाय
1. ब्लाँगिंग : आजच्या ह्या डिजीटल युगात ब्लाँगिंग सुदधा एक चांगला आँनलाईन करता येणारा व्यवसाय आहे.ज्यात महिला आपल्याला मिळेल त्या वेळेत कंटेट लिहुन पब्लिश करू शकत असतात.किंवा कंटेट लिहिण्यासाठी अजिबातच वेळ मिळत नसेल तर एखादा कंटेट रायटर देखील ब्लाँगवर रोज कंटेट लिहिण्यासाठी लावू शकतात.आणि ह्यात आपल्याला फक्त आर्टिकल लिहुन त्याचा एसीओ करून पब्लिश करायचे असते ज्यासाठी दिवसातुन कधीही रोज एक दोन तास दिले तरी पुरेसे आहे.फक्त ह्यात आपल्याला वाचकांची आवड बघुन कंटेट लिहावे लागतात.ह्यात गुंतवणुक फक्त डोमेन होस्टिंग खरेदी करण्याची असते जो खर्च आपल्याला दर वर्षी साधारणत तीन ते पाच हजार इतका करावा लागत असतो.
2. इंटेरिअर डिझाइनिंगचे काम करणे : अशा महिला ज्यांना इंटेरिअर डिझाइनिंगची आवड आहे.ज्यांनी इंटेरिअर डिझाइनिंगचा एखादा कोर्स देखील केला आहे त्या आपला स्वताचा इंटेरिअर डिझाइनिंगचा व्यवसाय सुरू करू शकतात.ज्यात आपल्याला लोकांच्या घरातील आतील साज सजावट तसेच डेकोरेशनचे काम बघायचे असते.
3. एससीओ कंसल्टन्सी सुरू करणे : आपल्या वेबसाईटवर ट्रँफिक आणण्यासाठी आणि आपली अरनिंग वाढवण्यासाठी तिचा एससीओ करणे हा एक खुप महत्वाचा भाग असतो.आणि भरपुर ब्लाँग तसेच वेबसाईट अशा असतात ज्यांना आपली वेबसाईट गुगलच्या सर्च इंजिनमध्ये फस्ट रँकला आणायची असते.पण एसीओचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे त्यांना आपली वेबसाईट फस्ट रँकला आणता येत नसते.मग अशा वेळेला काही कंपन्या तसेच ब्लाँगर आपली वेबसाईट फस्टला रँक करण्यासाठी एससीओ स्पेशलिस्टला हायर करत असतात.ज्यात तो स्पेशालिस्ट त्यांच्या वेबसाईटचा अशा पदधतीने एससीओ करतो की ती गुगलवर सर्च करताच पहिल्या क्रमांकाला तसेच टाँप पाच मध्ये तरी दिसत असते.आणि ही सेवा इतरांना देण्यासाठी आपल्याला सोशल मिडियावर अकाऊंट तसेच एक पेज तयार करावे लागत असते जिथे आपण देत असलेल्या सेवेविषयी लोकांना सांगु शकतो आणि त्या पेज मधुन आपला नंबर प्राप्त करून लोक आपल्यापर्यत पोहोचु शकतील.आणि आपण देत असलेल्या सेवेचा लाभ घेऊ शकतील.
4. वेब डिझाइनिंग करणे : ज्या महिलांना वेबसाईट डिझाईन करता येते तसेच त्यांनी ह्या कामाचा एखादा डिप्लोमा तसेच कोर्स केलेला असेल त्या महिला वेबसाईट डिझाइनिंगचा व्यवसाय करू शकतात.ह्यासाठी त्यांना अशा काही कंपनी तसेच एजन्सी सोबत संपर्क साधावा लागेल ज्या वेबसाईट बनवायचे आणि तिचे डिझाइन करण्याचे काम करते.
त्यांच्याशी संपर्क साधुन आपण त्यांच्यासाठी वेब डिझाइनिंगचे काम करू शकतो.
5. रिझ्युम तयार करणे : अशा महिला ज्यांना चांगला रिझ्युम तयार करता येतो त्या महिला आपला स्वताचा रिझ्युम रायटिंगचा व्यवसाय देखील करू शकतात.आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे आपला लँपटाँप,कँप्युटर तसेच प्रिंटर असणे गरजेचे असते.