चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी गावाजवळ एक धक्कादायक घटना समोर आलीय. धुळ्याकडून चाळीसगावकडे येणाऱ्या मेमू रेल्वेगाडीखाली सापडून गुराख्यासह सात गायी व एक म्हैस चिरडून ठार झाले. राजेंद्र भीमराव सूर्यवंशी (वय ५०) असे मृत गुराख्याचे नाव असून अंगावर शहारे आणणारी घटना होती.
नेमकी काय आहे घटना?
धुळ्याकडून निघालेली मेमू ट्रेन क्रमांक (०१३१०) ही चाळीसगावकडे निघाल्यानंतर खांबा क्रमांक ३४४ जवळ मेमूचा वेग अधिक असल्याने गुराख्यासह ८ जनावरे मेमू रेल्वेगाडीखाली सापडली. त्यात एकापाठोपाठ एक अशा सात गायी व एक म्हैस अशी आठ जनावरे चिरडून मृत्युमुखी पडली. तर रेल्वे येत असल्याने सूर्यवंशी जनावरे हाकण्यासाठी धडपड करीत असतानाच दुर्दैवाने तेही रेल्वेखाली सापडून त्यांचाही करुण अंत झाला. दरम्यान यात एक पारडू जबर जखमी झाले.
हे पण वाचाच..
अखेर आली गुडन्यूज ; सरकारने पेन्शनमध्ये केली ‘एवढ्या’ रुपयांची वाढ
तुमची अनेक कामे विवाह प्रमाणपत्राशिवाय होणार नाहीत, अशा प्रकारे करता येईल विवाह नोंदणी?
भुसावळ विभागात उद्यापासून दोन दिवस मेगाब्लॉक ; महाराष्ट्र एक्स्प्रेससह या रेल्वे गाड्या रद्द
शिदवाडी येथील प्रतापसिंग वजेसिंग जाधव यांची ही जनावरे होती. त्यांच्याकडे सालदार म्हणून राजेंद्र भीमराव सूर्यवंशी जनावरे राखण्याचे काम करीत होते. सूर्यवंशी एका हाताने दिव्यांग होते. ते ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले होते व तेथून येऊन ते पुन्हा मूळ मालकाच्या शेतात कामासाठी आजपासून रुजू झाले होते. पहिल्याच दिवशी त्यांच्या मृत्यूने त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे.