देशात महिलांसह मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच दीर वहिनीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. दीराने आपल्या विधवा वहिनीसोबत चुकीचं कृत्य केलं आहे. त्यानंतर संबंधित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.
ही घटना हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील आहे. विधवा महिला रात्री घरात झोपलेली होती. रात्रीचे 2 वाजले होते, मध्यरात्र झाली होती आणि त्यावेळी तिचा दीर घरी येतो. घरात कोणीच नव्हतं, याचाच तो फायदा घेतो. त्याच्याच वहिनीसोबत तो चुकीचं वर्तन करतो. वहिनीला जाग येते तेव्हा ती आरडाओरडा करते. जास्त गोंधळ झाल्यामुळे तिथून आरोपी दीराने पळ काढला. यानंतर दुसऱ्याच दिवशी ती पोलीस स्टेशनमध्ये जात दीराविरोधात स्टेशनमध्ये तक्रार दाखल करते.
हे पण वाचा..
Jalgaon : शेतकऱ्यांनो अजूनही कृषिपंपाचे वीजबिल भरले नाहीय? या तारखेपर्यंत मिळेल ३० टक्के सवलतीचा लाभ
अरे बापरे..! अनैतिक संबंधात सासरा ठरत होता अडथळा, सुनेने प्रियकराच्या मदतीने सासऱ्यालाच संपविले
खळबळजनक ; पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयातून भावाचा केला खून..!
जळगावकरांनो सावधान.! तुमच्याकडे तर नाही ही नोट? नकली नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड
दरम्यान, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. मात्र, आरोपी दीर फरार असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.