नाशिक : कोरोना काळात नोकर भरती केली गेली नसल्याने अनेक विभागात भरपूर पदे रिक्त आहेत. मात्र आता रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडून तयारी सुरु असून रिक्त पदांसाठी आराखडा मागविला गेला आहे. त्यानुसार प्रशासनाने नाशिक महापालिकेत रिक्त असलेली 2500 हून अधिक पदे भरण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे.
या पदासाठी कधीही जाहिरात प्रकाशित होऊ शकते त्यामुळे जे इच्छुक असतील त्या उमेदवाराने आतापासूनच तयारीला लागावे आणि त्यानुसार आपला अभ्यास, आपले कागदपत्र तयार ठेवावेत. नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आल्यानंतर पात्र आणि इच्छुक उमेदवाराची पळापळ होऊ नये व त्यांना या सर्व पदांची कल्पना अगोदरच मिळावी या उद्देशाने ही सर्व माहिती या पोस्टमध्ये तुम्हाला देण्यात आली आहे.
नाशिक महानगरपालिकेमध्ये अडीच हजाराहून अधिक पदावर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या स्थापनेवर असलेल्या प्रशासनाने घेतला आहे, यामध्ये अग्निशमन आणि वैद्यकीय विभागाच्या 704 जागा सह ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
आत्ताच झालेल्या महासभेमध्ये सेवा प्रवेशाचे नियमावली मंजूर करून जेवढी रिक्त पदे महानगरपालिकेत उपलब्ध असणार आहे तेवढे सर्व पद भरण्यास निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. पदभरतीच्या अधिकृत घोषणा खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही डाऊनलोड करू शकतात त्यामध्ये कोणकोणते पदे भरले जाणार आहेत कोणत्या विभागाचे पदे आहेत याची माहिती दिली आहे, ही माहिती बघून तुम्ही लगेच तयारीला लागू शकतात.
मागील 02 वर्षापासून महानगरपालिकेत कोणतीच नोकर भरती झालेली नाही शासनाच्या मान्यता नुसार गट ब संवर्गाच्या 14,000 नवीन पदाच्या सुधारित आकृतीबंधाला सरकारने मंजुरी दिली आहे.
हे सुद्धा वाचा..
सारस्वत बँकेत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी.. पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज
ISRO मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! मिळणार 56000 रुपये प्रति महिना पगार
या भरतीमध्ये प्रशासकीय सेवा, वैद्यकीय आरोग्य, अभियांत्रिकी (विद्युत) , अभियांत्रिकी (स्थापत्य) तसेच लेखापरीक्षण, जलतरण, नाट्यगृह, सभागृह, उद्यान व वृक्ष प्राधिकरण, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा माहिती तंत्रज्ञान अशा अकरा विभागांमध्ये सेवा प्रवेशाच्या नियमावली चा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी दिला होता त्या भरतीसाठी मंजुरी मिळाली आहे.
लवकरच ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने त्या त्या पदासाठी आतापासूनच तयार राहावे.