जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील यावल तालुक्यात ५८ वर्षीय वृद्धाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना काल दिनांक २४ मार्च रोजी घडली होती याप्रकरणी यावल पोलीस स्टेशन येथे CCTNS नं. १२२/२०२३ भादंवि क. ३०२ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान पोलिसांनी १८ तासात आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतला आहे. आरोपीने पोलिसांना कबुली जबाब देखील दिला आहे.
सविस्तर असे की,मयत भिमराव शंकर सोनवणे वय ५८ रा. किनगाव ता. यावल यास अज्ञात आरोपीतांनी गळावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन निर्घुन खुन केल्याची घटना घडल्यानंतर सदर ठिकाणी एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, डॉ. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर उपविभाग यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केल्यावर त्यांनी किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सदर गुन्हयांतील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन त्यांना अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार पोहेकॉ विजयसिंग पाटील, कमलाकर बागुल, सुधाकर अंभोरे, संदिप सावळे, पोना/ किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, रणजित जाधव, पोका ईश्वर पाटील, चापोना/दर्शन ढाकणे, चापोकों / प्रमोद ठाकुर अशांचे दोन पथक तयार केले. सदर पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हयांची माहिती मिळाल्या पासुन सतत १८ तास कसोसिने मेहनत घेत किनगाव मधील सर्व नागरिकांना घटनेबाबत विचारपुस करुन त्याच प्रमाणे त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे व तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांना संशयीत वाटत असलेल्या इसमाचा वरणगाव, उदळी व किनगाव गावात घेत घेतला असता आरोपी १) जावेदशाह ऊर्फ जय अलीशाह वय ३२ मुळ रा. प्रतिभानगर, वरणगाव ता. भुसावळ ह.मु. उदळी ता. रावेर याचा शोध वरणगाव येथे घेतला असता तो मिळून न आल्याने सदर पथक लागलीच उदळी ता. रावेर गावी धडकले. त्यावेळी वरील आरोपी हा उदळी गावात असल्याची माहिती मिळताच त्यांनी त्यास शिताफिने ताब्यात घेतले.
आरोपीस गुन्हयांबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा आरोपी २) मिनाबाई विनोद सोनवणे वय ३० रा. किनगाव ता. यावल यांच्या सांगण्यावरुन केल्याचे कबुल केले. सदर मयताच्या मानेवर ब्लेडने वार करुन निर्घुन खुन केल्याचे सांगितले. तेव्हा वरील पथकातील पोलीस अंमलदार यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील दुसरे पथकातील पोलीस अंमलदार यांचेशी संपर्क साधून आरोपी नं. २) मिनाबाई विनोद सोनवणे वय ३० रा. किनगाव ता. यावल यांना किनगाव गावातून लागलीच ताब्यात घेतले.
आरोपी नं. २ हिस विचारपुस करता सदर आरोपीने कळविले की, मयत हा आरोपी नं. २ हीचे कडेस शरिर सुखाची सतत मागणी करीत असे सततच्या त्रासाला कंटाळून आरोपी नं. २ हिने उदळी येथील तिच्या बहिणीने मानलेला मुलगा आरोपी नं.१ यास सदरचा प्रकार सांगून आरोपी नं.१ व २ यांनी कट रचुन सदरचा खुन केल्याचे उघड झाले आहे. वरील दोन्ही आरोपीतांना यावल पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले असून सदर गुन्हयांचा तपास पो. निरी. श्री. राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि श्री. सुनिल मोरे हे करीत आहेत.
अत्यंत महत्वाची बातमी! १ एप्रिलपासून बदलणार अनेक नियम, थेट तुमच्यावर होणार परिणाम…
धक्कादायक! अमळनेरात बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर दरोडा, थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद
12वी ते पदवी पास आहात? EPFO मार्फत निघाली तब्बल 2859 पदांसाठी भरती, भरपूर पगार मिळेल