पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना लाजीरवाण्या प्रसंगाचा सामना करावा लागला. येथील जंक्शनवर लावलेल्या स्क्रीनवर अचानक जाहिरातीऐवजी अश्लील चित्रपट प्रसारित झाला. यावेळी अनेक लोक आपापल्या कुटुंबासह उपस्थित होते. अशा परिस्थितीत काय करावे हे त्यांना समजत नव्हते. लोक इकडे तिकडे नजर चोरू लागले. जंक्शनवर महिला आणि मुलेही उपस्थित होते
रिपोर्टनुसार, पाटणा जंक्शनवर एलईडी स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ प्ले झाला तेव्हा तिथे मोठी गर्दी झाली होती. ट्रेनची वाट पाहणारे अनेक लोक आपल्या कुटुंबियांसह आले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने घटनास्थळी उपस्थित लोकांचे लाजेने पाणी सुटले हे नक्की. सुमारे 3 मिनिटांपासून हा अश्लील चित्रपट टीव्ही स्क्रीनवर प्रसारित होत आहे. ते बंद व्हायला एवढा वेळ का लागला, याचेही लोकांना आश्चर्य वाटले.
हे पण वाचाच..
महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे सावट कायम ; २५ मार्चपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
खुशखबर..! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती
सणासुदीला खाद्यतेल झाले स्वस्त, दरात मोठी घसरण ; पहा 1 लिटरचा दर
पहूर शिवरातील ज्वारीच्या शेतात ४० वर्षीय तरुणाचा खून!
प्रवाशांनीच रेल्वेला माहिती दिली
या घटनेमुळे अनेक प्रवासी संतप्त झाले. याबाबत जीआरपी आणि आरपीएफला प्रवाशांनीच माहिती दिल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आरपीएफने तत्काळ संबंधित एजन्सीला बोलावून अश्लील फिल्म चालवल्याची माहिती दिली. यानंतर त्याचे स्क्रीनवरील प्रसारण बंद झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच एजन्सीचे काही कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रेल्वेच्या व्यावसायिक विभागाच्या वतीने दत्ता कम्युनिकेशन या संबंधित एजन्सीविरुद्ध आरपीएफ पोस्टमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.