पाचोरा (प्रतिनिधी)- चेक अनादर प्रकरणी पाचोरा न्यायालयाने एकाची निदोर्ष मुक्तता केली.नासिर ब्रदर्स केला कंपनी यांना गोपीचंद हिलाल पाटील यांनी दोन लाख सतरा हजाराचा चेक एका व्यवहारात दिला होता.सदरिल चेक बाऊन्स झाल्या कारणानं नासिर ब्रदर्स केला कंपनीने मे.पाचोरा न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायमुर्ती श्रीखंडे यांच्या कोर्टात हा खटला चालवण्यात आला.
आरोपी गोपीचंद पाटील यांच्या तर्फे ॲड दिपक पाटील यांनी युक्तिवाद करून दोन साक्षीदार तपासण्यात आले यात गोपीचंद हिलाल पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.