मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळावरील केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘कुणी गाय मारली म्हणून वासरू मारू नये. आम्हीच नाही तर विधीमंडळाचे सदस्य उद्धव ठाकरेही चोर आहेत का, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘राऊतांचे विधान मी ही ऐकले. जर ते चोर विधीमंडळ म्हणत असेल तर आम्ही या विधीमंडळत का बोलावं. हे योग्य नाही. इतके नेते या विधीमंडळाने पाहिले आहेत. देशातील सर्वात उत्तम विधीमंडळ म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं’,
नेमकं काय म्हणाले होते राऊत?
कोल्हापुरात पोहोचताच संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. शिंदे गटावर टीका करताना संजय राऊत म्हणाले होते , ‘ ही बनावट शिवसेना आहे. हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. त्यांनी पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे गेली, पदं परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते.