सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू असून अनेक तरुण प्रेयसीच्या शोधात आहे. पण प्रपोज कुणाला करावं याचाही अंदाज हवा. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एका तरुणाच्या प्रपोजची चांगलीच चर्चा सुरू आहे. महाविद्यालयीन तरुणाने भररस्त्यात चक्क एका विवाहित महिलेला प्रपोज केलं. त्यानंतर भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. दरम्यान, याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे.
व्हिडीओत काय आहे?
व्हायरल झालेल्या व्हिडीओत भर रस्त्यात गोंधळ होत असलेला पहायला मिळत आहे. यामध्ये महिला म्हणत आहे की, याने मला काय म्हटले सांगायलाही लाज वाटत आहे. त्याचं वय काय आणि माझं वय काय. माझं मुलगाच याच्याएवढा असेल. महिला ओरडत ओरडत मुलाला विचारते, तुला लाज वाटत नाही का? अचानक एक व्यक्ती येऊन तरुणाच्या कानाखाली मारतो. त्यानंतर वातावरण अधिकच तापतं.
https://twitter.com/gharkekaleshh/status/1622998362139267073
व्हायरल होत असलेल्या या तरुणाचा व्हिडीओ @gharkekaleshh या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. विवाहित महिलेला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करायला गेलेल्या तरुणाची चांगलीत फजिती झाली आहे. तरुणाच्या या कृत्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे.