नवी दिल्ली : भारतातील बहुतांश लोक हे रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. कारण स्वस्त आणि आरामदायी प्रवास प्रवास असल्याने रेल्वेला महत्व दिले जते. परंतु अनेकांचे प्रवासादरम्यान तिकीट हरवते, त्यामुळे त्यांना तिकीट हरवल्यानंतर काय करावे असा प्रश्न पडतो. कारण तिकीट नसताना प्रवास केला तर दंड भरावा लागतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर जाणून घेऊया.
जर तुमचे तिकीट हरवले असेल तर आता तुम्ही तुमचे तिकीट मोबाईलवरूनही दाखवू शकता. परंतु, जर तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही तिकीट तपासनीसकडून तुमचे डुप्लिकेट तिकीट घेऊ शकता.
तुम्हाला डुप्लिकेट तिकीट बनवायचे असेल तर तुम्हाला 50 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागतील. जर रेल्वेचे तिकीट हरवले तर तुम्हाला त्वरित तिकीट तपासकाशी संपर्क साधावा लागणार आहे.
जर तुम्ही काउंटरवरून तिकीट खरेदी केले आणि चार्ट तयार करण्यापूर्वी ते हरवले असेल तर तुम्हाला स्लीपर क्लाससाठी 50 रुपये आणि एसी क्लाससाठी 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
चार्ट तयार केल्यानंतर हरवलेल्या तिकीटाची तक्रार केली तर तुम्हाला तिकिटाच्या 50 टक्क्यांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असताना तुम्हाला रेल्वेच्या या नियमांची माहिती असणे गरजेचे आहे.