नवी दिल्ली : देशात ऑनर किलिंगच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच आपल्या मुलीला तिच्या प्रियकरासोबत उसाच्या शेतात नको त्या अवस्थेत पाहिल्यानं वडिलांना राग अनावर झाला. रागाच्या भरात आरोपीने आपल्या मुलीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट देखील लावली. त्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र, पोलीस तपासात आरोपीनेच आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातल्या शाहजहापूरमधील आहे.
नेमकी काय आहे घटना?
आरोपीच्या मुलीचे गावातीलच एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, एक दिवस आरोपीने आपल्या मुलीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या वस्थेत पाहिलं. त्यानंतर त्याने आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला. डोक्यात विट मारून त्याने आपल्या मुलीची हत्या केली. त्यानंतर आरोपीने आपल्या मुलीचा मृतदेह दोरीने बांधून एका तलावात फेकून दिला. या मुलीच्या मृतदेहासोबत तिची सायकल देखील त्याने तलावात फेकली. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
24 जानेवारी रोजी या मुलीचा मृतदेह एका तळ्यात आढळून आला होता. मुलीची हत्या तिच्या वडिलांनीच केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सुखलाल असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.
आरोपीने हत्येची कबुली देताना पोलिसांना सांगितले की, त्याच्या मुलीचे गावातील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, अवनीश असं या मुलाचं नाव आहे. एक दिवस आपण त्या दोघांना नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं. मुलगी घरी आल्यानंतर मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने ऐकलं नाही. त्यामुळे रागाच्या भरात आपण तिच्या हत्येचा कट रचला. मुलीच्या डोक्यात विटेने जोरदार प्रहार करत तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह चादरीत गुंडाळून तळ्यात फेकून दिला. मृतदेहासोबतच मुलीचे कपडले आणि सायकपण तळ्यात फेकून दिल्याचं आरोपीने म्हटलं आहे.