मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. सोबतच वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी जाणवत आहे. त्यातच आता राज्यातील थंडीची परिस्थिती पाहता हवामान खात्याने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढच्या आठवड्यात थंडीची लाट येऊ शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे.
तसेच तामिळनाडूवर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. म्हणून २९ ते ३१ जानेवारीदरम्यान मध्य भारतात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच हवामानाच्या या शास्त्रीय परिस्थितीमुळे राज्यातील चार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी साधारण पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने नेमकं काय म्हटलं –
सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यात आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढू शकतो, असे अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची ही लाट कायम राहिल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
हे पण वाचाच..
१२ वीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या ; परिक्षेसाठीचे प्रवेशपत्र ‘या’ दिवशी होणार उपलब्ध?
पदवीधरांसाठी मोठी संधी! ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे ४० पदांची भरती
महादेवाच्या मंदिरातील दानपेटी फोडली ; चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद
राशिभविष्य २६ जानेवारी : ‘या’ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील
पिकांवरही होणार परिणाम –
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातही अजून थंडीचा जोर कायम आहे. तापमानाचा पारा घसरल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तर गहू, हरभरा, मका या पिकांनाही या वातावरणाचा फटका बसणार असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.