यावल । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येतेय. नराधमांना कायद्याचा धाकच राहिलेला नाहीय. दरम्यान, यावल तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीय. यावल तालुक्यात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून तिने मुलाला जन्म दिला आहे. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी आईवडीलांसह वास्तव्याला आहे. आईवडील आणि भाऊ हे हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात. गेल्या वर्षभरापासून अल्पवयीन मुलीने शाळेत जाणे बंद केले होते. त्यामुळे ती घरीच राहत होती. दरम्यान तिच्या मा एका अल्पवयीन मुलाने तिला काहीतरी आमिष दाखवत तिच्यावर गेल्या वर्षभरापासून अत्याचार सुरू केले, या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिली. गेल्या दिड महिन्यापुर्वी तिच्या नातेवाईकांमध्ये घरी गंधमुक्तीचा कार्यक्रम होता.
हे पण वाचा..
मोठी बातमी ! भारत जोडो यात्रेत चालताना खासदाराला हार्ट अॅटॅक, राहुल गांधींसमोरच झाले निधन
मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका या 6 गोष्टी, अन्यथा…
आज सोने -चांदीच्या किमतीत झाला ‘हा’ मोठा बदल ; खरेदीपूर्वी वाचा आजचा भाव?
आमदाराकडे नोटांचा डोंगर पाहून प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम..
त्या कार्यक्रमात मुलीच्या चालण्या बोलण्या वरून तिच्या आईवडीलांना संशय आला. अधिक चौकशी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पिडीत अल्पवयीन मुलीने शुक्रवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता बाळाला जन्म दिला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.