पाचोरा,(प्रतिनिधी)- विद्येची महानायीका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दि.३ जानेवारी २०२३ मंगळवार रोजी सकाळी १० वा. प्रतिमा पुजन व माल्यार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सर्व बहुजन समाज बांधव, फुले प्रेमी, सावित्रीबाई च्या समाजातील बहुसंख्य महिला, युवती यांनी मोठ्या संख्येने नवीन महात्मा फुले स्मारकाच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ अध्यक्ष संजय महाले उपाध्यक्ष के.एस.महाजन यांनी केले आहे