नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय महिलेनं १७ वर्षीय मुलाचे अपहरण करत त्याच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिन्यांनंतर संशयित महिलेला अटक केली आहे.
नेमकी काय आहे घटना?
संशयित आरोपी महिला ही चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रगौली परिसरात राहते. ऑक्टोबर २०२२ मध्ये या महिलेने घराशेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याला एका हॉटेलमध्ये नेऊन वारंवार बलात्कार केला.
हे पण वाचा..
आयकर न भरणार्यांना सरकारने दिली खूशखबर.. ‘या’ तारखेपर्यंत भरा ITR
येत्या विधानसभा निवडणूकीत शिंदे गटाचा हा आमदार निवडणूक लढवणार नाही ; भाजप आमदाराचा गौप्यस्फोट
पोरांनो तयारीला लागा.. नव्या वर्षात होणार पोस्ट खात्यात 98 हजार जागांवर मेगाभरती
1 जानेवारीपासून 2000 च्या नोटा बंद होणार? 1000 ची नवीन नोट होणार? काय आहे सत्य जाणून घ्या
दरम्यान, मुलाच्या अपहरणाची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सदरील मुलाचा तपास सुरू केला होता. यावेळी मुलगा हा प्रयागराज येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतलं.पोलीस येत असल्याचं कळताच आरोपी महिलेने पळ काढला होता. आता दोन महिन्यानंतर या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या महिलेनं आपल्याला वेगवेगळे अमिष दाखवून तसेच फूस लावून पळवून नेलं होतं, असा जबाब १७ वर्षीय मुलाने पोलिसांना दिला आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहे.