सामान्य रुग्णालय जळगाव येथे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणाऱ्या जनरल नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम.) ३ वर्ष कालावधी प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.या वर्षाकारिता एकूण ४० जागा आहेत.
अ.जा.- ०५
अ.ज.- ०३
वि.जा. अ.- ०१
भ.ज.ब- ०१
भ.ज. क – ०१
भ.ज. ड – ०१
वि.मा.प्र- ०१
इ.मा.व – ०४
अर्थिक दुर्बल घटक – ०४
खुला- १५
१) जागांचे आरक्षण
■ पुरुष उमेदवारांचे प्रमाण ९: १ (९ महिला १ पुरुष ) असे असेल
■ अपंग आरक्षण ५% ( फक्त पायांचे ४० ते ५०% अपंगत्व ग्राह्य धरण्यात येईल. )
■ ए.एन.एम. आरक्षण :- ५ % (महाराष्ट्र राज्य नोंदणी व नूतनीकरण आवश्यक )
■ आशा स्वयंसेविकांच्या बाबतीत २ जागा राखीव असतील (सलग तीन वर्ष सेवा होणे आवश्यक आहे. )
2) वयोमर्यादा :- दि. ३१/०८/२०२२ रोजी उमेदवाराचे वय १७ पेक्षा कमी व ३५ पेक्षा जास्त असू नये (उमेदवाराचा जन्म ३१ ऑगस्ट २००५ नंतरचा व ३१ ऑगस्ट
३) शैक्षणिक पात्रता: उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य १९८७ पूर्वीचा नसावा.परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्र विषयासह कमीत कमी ४०% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.मात्र मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत किमान ३५% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाही तर सदर मंडळाची कोणत्याही शाखेतील तसेच कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक (१० + २) परीक्षा कमीत कमी ४०% गुणांनी उत्तीर्ण करणाऱ्या खुल्या गटातील उमेदवारांचा व कमीत कमी ३५% गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय गटातील उमेदवारांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल.
४) प्रशिक्षणाचा कालावधी : ३ वर्ष
५) विद्यावेतन शासकीय नियमानुसार
६) फॉर्म फी : खुल्या प्रवर्गासाठी रु.५००/-मागास प्रवर्गासाठी रु. २५०/-
७) प्रवेश अर्ज दि. २०/१२/२०२२ ते २३/१२/२०२२ या कालावधीत सकाळी १०.०० ते ५.०० वाजे पर्यंत (रविवार व शासकीय सुट्टी सोडून) परिचर्या प्रशिक्षण महा- विद्यालय, सामान्य रुग्णालय जळगाव येथे उपलब्ध असतील.
८) संपूर्ण भरलेले अर्ज दि. २०/१२/२०२२ ते २४/१२/२०२१ या कालावधीत सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत (रविवार व शासकीय सुट्टी सोडून) परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय जळगांव येथे स्वीकारले जातील.
९) संपूर्ण भरलेल्या अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती जोडणे आवश्यक आहे, तसेच त्या वेळेस मूळ प्रती सुध्दा दाखविण्यास आणाव्यात.
■ शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला
■ १० वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
■ १२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
■ अर्हताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले त्या बाबतचे शाळा महाविद्यालयाचे प्रमाणपत्र ( Attempt Certificate)
■ महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
। भारतीय नागरिकत्वाचा दाखला (Nationality Certificate )
■ जात प्रमाणपत्र ( Caste Certificate)
■ जात वैधता प्रमाणपत्र ( Caste Validity) नॉनक्रिमीलेअर दाखला
■ शासकीय रुग्णालयातील सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र (अर्जासोबत जोडलेल्या विहित नमुन्या नुसार सादर करावे.)
■ राखीव गटातील उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करावीत
■ आधार कार्ड
(१०) प्रशिक्षण कालावधीत परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय व वसतिगृहाचे शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
(११) निवड करण्यात येणारा उमेदवार शारीरिक व मानसिक दृष्टया सक्षम असणे आवश्यक आहे. १२) जळगाव जिल्ह्याच्या तसेच नजीकच्या ज्या जिल्ह्यांमध्ये जी.एन.एम. प्रशिक्षण संस्था नाही अशा जिल्ह्यातील उमेदवारांनाच जळगाव प्रशिक्षण केंद्रात अर्ज करता येईल.
(१३) प्रशिक्षणासाठी पात्र ठरलेला उमेदवार हा शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा या करीता शासकीय रुग्णालयातील सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित | केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्या नंतरच सदर उमेदवाराचा प्रवेश निश्चित समजण्यात येईल.
(१४) दि. २८/१२/२०२२ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी व मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी सूचना फलकावर लावण्यात येईल. १५) समुपदेशन व मूळ प्रमाणपत्र पडताळणी दि.२९/१२ /२०२२ रोजी मुलाखतीस पात्र उमेदवारांनी सकाळी १०.०० वाजता परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय आवार जळगाव येथे होईल. समुपदेशनासाठी येतांना सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती सोबत आणने आवश्यक आहे.
१६) उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करते वेळी कोणत्याही प्रकारच्या प्रमाणपत्राची त्रुटी, चुकीची माहिती, खाडाखोड अथवा बदल केलेला आढळून आल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
(१७) अर्ज स्वीकारण्याचा व नाकारण्याचा संपूर्ण अधिकार जिल्हा शल्य शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय जळगाव यांचेकडे राहील. १८) उपरोक्त जाहिरातीविषयी व संपूर्ण प्रवेशा बाबतच्या माहितीकरिता प्राचार्या परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्याशीच संपर्क साधावा.
जिल्हा शल्य चिकित्सक
सामान्य रुग्णालय, जळगाव