जळगाव | जळगाव जिल्हा दूध संघांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यासाठी आज रविवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. यात सुरुवातीलाच जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत ना. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असलेले अरविंद देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवत शेतकरी विकास पॅनलचे खाते उघडले आहे.
जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जमाती या प्रवर्गातून शेतकरी विकास पॅनलमधून अरविंद भगवान देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या समोर विजय रामदास पाटील हे सहकार पॅनलमधून उभे होते. रविवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. यात भटक्या-विमुक्त जमाती वर्गवारीचा निकाल लागला. यात अरविंद देशमुख यांनी तब्बल 90 इतक्या मताधिक्याने विजयी पताका फडकवली आहे.
हे सुद्धा वाचा…
जिल्हा दुध संघ निवडणुकीत ‘या’ पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल?
जळगाव जिल्हा दूध संघ निकाल ; सुरुवातीलाच हे उमेदवार झाले विजयी
या राशींच्या लोकांनी आज सावध राहावं, असा असेल तुमचा दिवस?
मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासीक निर्णय ; आता तृतीयपंथीयांनाही पोलीस खात्यात मिळणार संधी..
अरविंद देशमुख यांनी आधी दुध संघावर प्रशासक म्हणून काम केले होते. आ. मंगेश चव्हाण यांच्या साथीने त्यांनी संचालक मंडळाचा गैरव्यवहार चव्हाट्यावर मांडण्यात मोलाची भूमिका पार पाडली होती. यानंतर त्यांना उमेदवारी देखील मिळाल्याने त्यांच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.