सरकारी नोकरीच्या शोधता असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आलीय. केंद्रीय विद्यालय संघटनेने विविध पदे भरण्यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार पात्र आहेत आणि या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते KVS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सूचना तपासू शकतात. या भरती मोहिमेद्वारे 13,404 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी नोंदणी 05 डिसेंबर 2022 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2022 आहे. अर्जाची लिंक सक्रिय झाल्यानंतर उमेदवार अर्ज करू शकतात.
या पदांवर भरती केली जाणार
या भरती मोहिमेअंतर्गत, प्राथमिक पदवीधर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), पदव्युत्तर शिक्षक (PGT), PRT संगीत, सहाय्यक प्राचार्य आणि उपमुख्याध्यापक अशा विविध पदांसाठी रिक्त जागा भरल्या जातील. ग्रंथपाल, वित्त अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ), वरिष्ठ सचिवालय सहाय्यक (यूडीसी), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (एलडीसी), हिंदी अनुवादक आणि स्टेनोग्राफर ग्रेड-II यासह शिक्षकेतर पदे देखील असतील.
शैक्षणिक पात्रता :
PRT- प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी उमेदवारांनी D.Ed/JBT/B.Ed सोबत CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
TGT – B.Ed सह CTET उत्तीर्ण असावे.
PGT – पोस्ट ग्रॅज्युएशन आणि B.Ed सह CTET उत्तीर्ण असावे.
अशी होईल निवड?
या रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी असेल आणि या CBT उत्तीर्ण उमेदवारांची निवड अंतिम मानली जाईल. हे देखील जाणून घ्या की उमेदवाराने परीक्षा उत्तीर्ण केल्यावर, त्याला संपूर्ण भारतात पोस्ट केले जाऊ शकते.
हे सुद्धा वाचा :
भुसावळ, मुंबई येथे रेल्वेत मोठी भरती ; 10पास असणाऱ्यांनी त्वरित अर्ज करा..
7वी पाससाठी अहमदनगरमध्ये भरती सुरु; त्वरीत करा अर्ज
ग्रॅज्युएट उमेदवारांना सरकारी नोकरीचा चान्स.. इस्रोमध्ये तब्बल 525 रिक्त जागांसाठी भरती
खुशखबर.. राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात विविध पदांची भरती
अर्जाची फी :
UR, OBC आणि EWS उमेदवारांना अर्जासाठी 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि PWD उमेदवारांना फी म्हणून काहीही द्यावे लागणार नाही. ऑनलाइन मोडद्वारे फी भरा.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे तर विविध पदांनुसार कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पदव्युत्तर शिक्षक पदासाठी कमाल वय 40 वर्षे, पदवीधर शिक्षक आणि ग्रंथपाल पदासाठी 35 वर्षे आणि PRT साठी 30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते.
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा