पाचोरा – तालुक्यातील नाचणखेडा रहिवासी व अजिंठा येथील स्वर्गीय बाबुराव काळे महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक सोनूसिंग प्रल्हाद पाटील हे अर्थशास्त्र या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले अाहेत. या यशाबद्दल साेनूसिंग पाटील यांचे प्राचार्या डॉ. मीना पाटील, पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. वासुदेव वले, डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. बी. एस. भालेराव, प्रा. एस. बी. तडवी, प्रा. जनार्दन देवरे, प्रा. श्रावण कोळी आदींनी काैतुक केले अाहे.