जळगावः जळगाव दूध महासंघाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते, अशी वक्तव्ये शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे याच्याकडून आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या सगळ्या शक्यता धुडकावून लावल्या आहेत.
आमदार मंगेश चव्हाण यांनी बिनविरोध निवडणुकीची शक्यता साफ फेटाळून लावली. ते म्हणाले, मी एकनाथ खडसेंच्या सावलीत उभा राहणार नाही. च्यावर आपण एवढे आरोप केले त्यांच्यासोबत कसा गेल्यास लोक तोंडात शेण घालतील.. सोयीसाठी राजकारण केल्यास लोकांचा सरकारवरचा विश्वास उडेल.. मी निवडणूक लढवणार खडसे बिनविरोध होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
जळगाव दूध महासंघाची ही निवडणूक एकूण 20 जागांवर लढवली जाणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण तसेच शिंदे गटाचे आमदार व मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलीच फील्डींग लावल्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.
हे पण वाचा..
तरुणांसाठी खुशखबर.. SSC GD कॉन्स्टेबलच्या 20,000 हून अधिक पदांमध्ये वाढ, पहा नवीन जागा
धावती ट्रेन पकडण्याच्या नादात महिलेचा तोल गेला अन्… पाहा धक्कादायक व्हिडीओ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच.. ठाकरेंची खळबळजनक भविष्यवाणी
जळगाव दूध महासंघाची निवडणूकीसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्हवाटप करण्यात येणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.