चाळीसगाव – येथील केमिस्ट भवनात नुकतीच चाळीसगाव तालुका महिला शिक्षक संघ शाखेची पुनर्रचना व नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी सुदर्शना सोनवणे, जिल्हा उपाध्यक्षपदी प्रभा बाविस्कर यांची निवड झाली. तालुका कार्यकारिणीची देखील पुनर्रचना करण्यात आली.
याप्रसंगी महिला शिक्षक संघाच्या विविध समस्या व कामाबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच राज्य व जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यात लक्ष्मण धाकलू चव्हाण (राज्य पुरस्कार), प्रदीप पाटील, संगीता पाटील व रवींद्र निकम (जिल्हा पुरस्कार) यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन आशा महाले, तर आभार नूतन तालुकाध्यक्षा सुदर्शना सोनवणे यांनी मानले. जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती राणे, जिल्हा सरचिटणीस शुभांगी पाटील, जिल्हा कोषाध्यक्षा छाया पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष नवल पाटील, महिला कार्याध्यक्षा संगीता पाटील, कोषाध्यक्ष राजू गायकवाड, चाळीसगाव तालुकाध्यक्ष उमेश पाटील, सरचिटणीस नाना सोनवणे उपस्थित होते.
सुदर्शना सोनवणे यांचे स्वागत करताना महिला शिक्षक संघ पदाधिकारी.