महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री जी की पत्नी के सामने स्वामी रामदेव द्वारा महिलाओं पर की गई टिप्पणी अमर्यादित और निंदनीय है। इस बयान से सभी महिलाएँ आहत हुई हैं, बाबा रामदेव जी को इस बयान पर देश से माफ़ी माँगनी चाहिए! pic.twitter.com/1jTvN1SnR7
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) November 26, 2022
मुंबई,(प्रतिनिधी)- ‘महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात…. असं वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केलं होतं याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहे, तर यावेळी बाबा रामदेव यांच्या मोठी टीका, निषेध देखील होतं असून बाबा रामदेव यांनी महिलांची माफी मागावी अशी मागणी होतं आहे.
शुक्रवार दिनांक २५ रोजी पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन ठाण्यातील हायलँड येथे करण्यात आले होते. या संमेलनास अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी बाबा रामदेव हे महिलांशी संवाद साधत होते. त्यावेळी महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे या संबंधीचा व्हिडीओ देखील राष्ट्रवादी काँग्रेस ने इंस्टाग्राम या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मंच वर बाबा रामदेव यांच्या सोबत अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या… त्यांच्या समोरच हा प्रकार घडला तरि देखील त्या या विषयावर गप्प का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातं आहे.
नंगा आदमी महिलाओं पर अभद्र टिप्पणी करता हैं तो लगता रेप को ऐसे लोग बढ़ावा देते हैं…बाबा रामदेव को देश की महिलाओं से माफ़ी मांगनी चाहिए.. pic.twitter.com/hnSglUvpGW
— nidhi ratan (Aitareya) (@nidhiratan11) November 26, 2022