सोलापुर,(प्रतिनिधी)- सोलापूर विमानतळ संदर्भात सोलापूर विकास मंच च्या वतीने चक्री उपोषण सुरु आहे, उपोषण सुरु असतांनाच आंदोलक आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालकमध्ये बाचाबाची झाली आहे दरम्यान संचालक काडादी यांनी चक्क खिशातून रि्व्हॉल्व्हर काढून आंदोलक केतन शाह यांना धमकवल्याचा प्रकार समोर आला असून यासंबंधीचा व्हिडिओ देखील सोलापूर विकास मंच च्या वतीने ट्विटर वर पोस्ट केला आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संध्याकाळी ६ वाजेच्या जावळपास ही घटना घडली. याप्रकरणी धर्मराज काडादी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.सोलापूर विकास मंच च्या वतीने सोलापूर विमानतळ संदर्भात केतन शाह हे उपोषण करत आहेत. या उपोषणस्थळी येऊन ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी उपोषणकर्ते केतन शाह यांना दमदाटी केली.
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये उपोषणाच्या ठिकाणी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज कडादी आणि सोलापूर मंचचे केतन शहा यांच्यात वादावादी निर्माण झाल्याचे दिसत आहे . या बाचाबाची दरम्यान संचालक कडादी आंदोलन कर्त्याला ‘तुम्हाला गोळ्या घालीन अशी धमकी देतांना दिसत आहे, यासह बराच संवाद यावेळी झालेला दिसून येतं आहे.धर्मराज कडादी यांनी आपल्याला दिल्याचा गंभीर आरोप मंचचे केतन शहा यांनी केला आहे.
धर्मराज काडादी यांनी काल पिस्तूल रोखुन जीवे मारण्याची धमकी दिली ती फक्त सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना व केतनभाई शहा यांच्यावर पिस्तूल रोखुन दिली नाही तर ती सर्व सोलापूरकरांवर रोखली आहे @mieknathshinde @CMOMaharashtra @PMOIndia @Dev_Fadnavis @AmitShah @JM_Scindia @nitin_gadkari pic.twitter.com/cNRCPsndgw
— Solapur Vikas Manch (@Solvikasmanch) November 27, 2022